SBI मध्ये 80 लाखांच्या पगाराची नोकरी, पदवीधर असाल तर संधी! पण ही एकच अट
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने स्पेशलिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी वर्षाला 80 लाख रुपयांपर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे.

SBI नोकरीची संधी
SBI ने नवीन नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने स्पेशलिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असावा. तसेच, बँकिंग, आयटी किंवा ई-कॉमर्स क्षेत्रात किमान 15 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे, अशी अटही आहे.
स्पेशलिस्ट केडर ऑफिसर पद
निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होते. आधी अर्जांच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड होईल. निवडलेल्या उमेदवारांना 5 वर्षांच्या करारावर नियुक्त केले जाईल. या भरतीचे मुख्य आकर्षण पगार आहे. वरिष्ठ पदांसाठी पगार 40 लाख ते 80 लाख रुपयांपर्यंत असू शकतो.
SBI विशेष अधिकारी पगार
उपव्यवस्थापक पदांसाठी मासिक पगार सुमारे 64,820 ते 93,960 रुपये मिळण्याची शक्यता आहे. बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनुभव असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. सरकारी बँकेतील नोकरीची सुरक्षा, चांगला पगार आणि जबाबदारीचे पद यामुळे अनेकांचे आयुष्य बदलू शकते.

