- Home
- Utility News
- SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आता ऑनलाइन पेमेंट करताना येणार अडचण; जाणून घ्या सविस्तर
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आता ऑनलाइन पेमेंट करताना येणार अडचण; जाणून घ्या सविस्तर
SBI Users: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 7 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1:20 ते दुपारी 2:20 या वेळेत नियोजित देखभालीमुळे काही ऑनलाइन सेवा बंद राहतील. इंटरनेट बँकिंग, YONO, इतर काही सेवा या काळात उपलब्ध राहणार नाहीत, परंतु UPI Lite, ATM सेवा सुरू राहतील.

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. बँकेने जाहीर केल्यानुसार, 7 सप्टेंबर 2025 रोजी काही काळासाठी त्यांच्या काही महत्त्वाच्या ऑनलाइन सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे, जर तुम्हाला काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करायचे असतील, तर ते वेळीच पूर्ण करून घ्या.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 1:20 ते दुपारी 2:20 या वेळेत नियोजित देखभालीमुळे (Scheduled Maintenance) इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, CINB, YONO Business Web आणि मोबाईल ॲप यांसारख्या सेवा तात्पुरत्या बंद राहतील. या काळात, तुम्हाला या सेवा वापरता येणार नाहीत.
तुम्हाला गैरसोय होऊ नये म्हणून...
या देखभाल कामामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी, बँकेने तुम्हाला आवश्यक असलेले सर्व व्यवहार या वेळेपूर्वी किंवा नंतर करण्याचे आवाहन केले आहे.
चिंता करू नका, 'या' सेवा सुरू राहतील!
या देखभाल वेळेत, काही महत्त्वाच्या सेवा मात्र सुरू राहणार आहेत. तुम्ही UPI Lite आणि ATM सेवांचा वापर करू शकता.
NPCI च्या माहितीनुसार, UPI Lite ही एक सोपी पेमेंट सुविधा आहे, जिच्या मदतीने तुम्ही पिनशिवाय 1,000 रुपयांपर्यंतचे छोटे व्यवहार करू शकता. या सुविधेद्वारे एका दिवसात तुम्ही एकूण 10,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. तुमच्या UPI Lite खात्यात जास्तीत जास्त 5,000 रुपये शिल्लक ठेवता येतात. त्यामुळे, छोट्या व्यवहारांसाठी तुम्ही या सुविधेचा वापर करू शकता. तुमचे महत्त्वाचे व्यवहार ठरलेल्या वेळेत पूर्ण करा आणि संभाव्य अडचण टाळा.

