सॅमसंगने त्यांच्या आगामी गॅलेक्सी S27 सीरिजसाठी नवीन Exynos 2700 चिपसेटचं प्रोडक्शन सुरू केलंय. २ नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवर बनलेला हा चिपसेट जबरदस्त परफॉर्मन्स आणि कमी बॅटरी खर्च करेल. क्वालकॉमवरचं अवलंबित्व कमी करून स्वतःचे चिपसेट वापरण्यावर कंपनीचा भर आहे.

सॅमसंग आता त्यांच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजमध्ये स्वतःचे चिपसेट जास्त वापरण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने नेक्स्ट जनरेशन Exynos 2700 चिपसेटचं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन सुरू केलंय. गॅलेक्सी S27 सीरिजच्या बऱ्याच मॉडेल्समध्ये हा नवीन चिपसेट पाहायला मिळू शकतो. मागच्या Exynos 2600 च्या तुलनेत Exynos 2700 चं प्रोडक्शन १० टक्क्यांनी वाढवण्यात आलंय. नवीन गॅलेक्सी S27 प्रो मॉडेल सीरिजमध्ये ॲड केल्यामुळे हे प्रोडक्शन वाढवल्याची चर्चा आहे.

Exynos 2700 चं प्रोडक्शन सुरू

कोरियन टेक पब्लिकेशन 'द इलेक'च्या रिपोर्टनुसार, Exynos 2700 ने सॅम्पल प्रोडक्शनचा टप्पा पार केलाय आणि आता फुल-स्केल वेफर प्रोडक्शन सुरू झालंय. Exynos 2600 च्या तुलनेत या नवीन चिपसेटचं प्रोडक्शन १० टक्क्यांहून अधिक वाढलंय. यामुळे गॅलेक्सी S27, गॅलेक्सी S27 प्लस आणि नवीन गॅलेक्सी S27 प्रो या मॉडेल्समध्ये Exynos 2700 वापरण्याची शक्यता खूप वाढली आहे.

भारतातही Exynos चिपसेट येणार?

कोरिया, भारत आणि युरोपसारख्या मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या गॅलेक्सी S27 सीरिजच्या मॉडेल्समध्ये Exynos 2700 वापरला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि चीनसारख्या मार्केटमध्ये सॅमसंग क्वालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 (Snapdragon 8 Elite Gen 6) सीरिज चिपसेट वापरण्याचा विचार करत आहे.

गॅलेक्सी S27 अल्ट्राच्या चिपसेटबाबत सॅमसंगने अजून फायनल निर्णय घेतलेला नाही. मागच्या गॅलेक्सी S26 अल्ट्रा मॉडेलमध्ये सगळ्या मार्केट्ससाठी क्वालकॉमचा फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन चिपसेट वापरला होता. पण यावेळी अल्ट्रा मॉडेलमध्येही Exynos 2700 देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे.

परफॉर्मन्समध्ये Exynos बाजी मारणार?

सॅमसंगला त्यांच्या या नवीन Exynos चिपसेटच्या परफॉर्मन्सवर खूप कॉन्फिडन्स आहे. कंपनीच्या इंटरनल गीकबेंच 6 (Geekbench 6) टेस्टिंगमध्ये, Exynos 2700 ने क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्स्ट्रीम जेन 6 ला मल्टी-कोर परफॉर्मन्समध्ये ९.५ टक्क्यांनी मागे टाकल्याचा दावा रिपोर्टमध्ये केलाय.

स्नॅपड्रॅगन चिपसेटला १२,८५६ पॉईंट्स मिळाल्याचं बोललं जातंय, त्यामुळे Exynos 2700 सहज १४,००० पॉईंट्सचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे. पण सिंगल-कोर परफॉर्मन्समध्ये Exynos 2700 अजूनही क्वालकॉमच्या मागे आहे. त्यामुळे गॅलेक्सी S27 अल्ट्रा मध्ये नवीन चिपसेट वापरायचा की नाही, यासाठी सॅमसंग फक्त बेंचमार्क रिझल्ट्सवर अवलंबून राहणार नाही.

२ नॅनोमीटर टेक्नॉलॉजी

सॅमसंग फाउंड्रीच्या सेकंड जनरेशन २ नॅनोमीटर SF2P मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून Exynos 2700 बनवला जातोय. फर्स्ट जनरेशन SF2 टेक्नॉलॉजीच्या तुलनेत, या नवीन प्रोसेसमुळे १२ टक्क्यांपर्यंत चांगला परफॉर्मन्स आणि २५ टक्के कमी पॉवर कंजम्पशन मिळेल, असा सॅमसंगचा दावा आहे. याशिवाय, चिपसेटची साईझ ८ टक्क्यांनी कमी करायलाही ही नवीन टेक्नॉलॉजी मदत करेल.

क्वालकॉमवरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न

Exynos चिपसेटचा वापर वाढवल्यामुळे सॅमसंगला क्वालकॉमवरचं अवलंबित्व कमी करायला आणि पार्ट्सचा खर्च आटोक्यात ठेवायला मदत होईल. पण गॅलेक्सी S27 अल्ट्राच्या बाबतीत हिटिंग इश्यू, रिअल-लाईफ परफॉर्मन्स आणि पुरेशा प्रमाणात चिपसेट बनवण्याची क्षमता या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतील. त्यामुळे गॅलेक्सी S27 सीरिजसाठी सॅमसंगची फायनल चिपसेट स्ट्रॅटेजी काय असेल, हे येत्या काही दिवसांत अधिक स्पष्ट होईल.