- Home
- Utility News
- आता 30 मिनिटांत चार्ज!, सॅमसंग S26 अल्ट्रा 60W फास्ट चार्जिंगसह, जबरदस्त फिचर्स, किंमत किती?
आता 30 मिनिटांत चार्ज!, सॅमसंग S26 अल्ट्रा 60W फास्ट चार्जिंगसह, जबरदस्त फिचर्स, किंमत किती?
Samsung Galaxy S26 Ultra : सॅमसंग गॅलेक्सी S26 हा फोन येत्या 25 फेब्रुवारी 2026 रोजी लाँच होणार आहे. यामध्ये 60W चार्जिंग देण्यात आले असून हा फोन खूप लवकर चार्ज होणार आहे. त्यामुळे यामध्ये नवीन काय फिचर्स आहेत, ते जाणून घेऊ.

सॅमसंग गॅलेक्सी S26 -
Samsung Galaxy S26 Ultra : स्मार्टफोनप्रेमी आतुरतेने वाट पाहत असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी S26 सीरिजबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जानेवारी 2025 मध्ये गॅलेक्सी S25 सीरिज लाँच झाल्यानंतर, आता S26, S26 प्लस आणि S26 अल्ट्रा हे मॉडेल्स बाजारात येणार आहेत. सुरुवातीला हे फोन जानेवारीच्या अखेरीस लाँच होतील असे म्हटले जात होते, पण आता विश्वसनीय सूत्रांनुसार लाँचची तारीख फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
25 फेब्रुवारीला भव्य लाँच? -
Samsung Galaxy S26 Ultra : टेक्नॉलॉजी जगतातील प्रसिद्ध टिपस्टर इव्हान ब्लास (Evan Blass) यांनी सांगितले आहे की, सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा स्मार्टफोन 25 फेब्रुवारी 2026 रोजी लाँच होणे "100 टक्के निश्चित" आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होणाऱ्या सॅमसंगच्या प्रसिद्ध 'अनपॅक्ड' (Unpacked) इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन सादर केला जाऊ शकतो. मागील वर्षांच्या तुलनेत हे लाँच थोडे उशिरा होत असले तरी, सॅमसंग डिस्प्ले, परफॉर्मन्स आणि चार्जिंग स्पीडमध्ये अनेक मोठे बदल करणार आहे.
आकर्षक डिस्प्ले आणि पॉवर सेव्हिंग -
Samsung Galaxy S26 Ultra :गॅलेक्सी S26 अल्ट्रा मध्ये गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठे डिस्प्ले अपग्रेड्स अपेक्षित आहेत. यात सॅमसंगचे अत्याधुनिक M14 OLED पॅनल वापरले जाऊ शकते. हे S25 अल्ट्रामधील M13 पॅनलपेक्षा 20 ते 30 टक्के जास्त पॉवर एफिशियंट (Power Efficient) आहे. म्हणजेच, जास्त ब्राइटनेसपेक्षा बॅटरी लाईफ जास्त काळ टिकण्याला या डिस्प्लेमध्ये प्राधान्य दिले आहे.
विजेच्या वेगाने चार्जिंगची सुविधा -
Samsung Galaxy S26 Ultra : सॅमसंगचे चाहते बऱ्याच काळापासून ज्या बदलाची वाट पाहत होते, तो बदल आता होणार आहे. S26 अल्ट्रा मॉडेल 45W चा अडथळा पार करून 60W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, असे म्हटले जात आहे. अंतर्गत चाचण्यांनुसार, हा फोन 0 ते 75 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतील. याशिवाय, सुरक्षित आणि वेगवान वायरलेस चार्जिंगसाठी 'Qi2' स्टँडर्डचे 25W मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग फीचर देखील यात असू शकते.
शक्तिशाली प्रोसेसर आणि परफॉर्मन्स -
Samsung Galaxy S26 Ultra : जगभरात गॅलेक्सी S26 अल्ट्रा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटवर चालेल हे जवळपास निश्चित झाले आहे. TSMC च्या 3nm तंत्रज्ञानावर बनवलेला हा चिपसेट AI कार्यांमध्ये उत्कृष्ट वेग देईल. मल्टीटास्किंग आणि गेमिंगचा अनुभव सुधारण्यासाठी, 10.7 Gbps स्पीडचा वेगवान LPDDR5X रॅम यात दिला जाऊ शकतो.
कॅमेरा अपडेट्स: अचूक फोटो -
Samsung Galaxy S26 Ultra : कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यावेळी सॅमसंगने 'लाइट सेन्सिटिव्हिटी' (Light Sensitivity) आणि रिझोल्यूशनवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. 200MP मुख्य कॅमेरा आणि 5x टेलीफोटो लेन्समध्ये मोठे अपर्चर (Wider Aperture) असेल. यामुळे कमी प्रकाशातही अत्यंत स्पष्ट फोटो काढता येतील. याशिवाय, 3x टेलीफोटो लेन्स 10MP वरून 12MP मध्ये अपग्रेड केला जाईल, ज्यामुळे झूम करताना चांगला दर्जा मिळेल.

