- Home
- Utility News
- Colon Cancer मध्ये पहिल्या स्टेजमध्ये दिसणारी लक्षणं कोणती? लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा!
Colon Cancer मध्ये पहिल्या स्टेजमध्ये दिसणारी लक्षणं कोणती? लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा!
Rising Colon Cancer in Youth Symptoms : तरुणांमध्ये कोलन कॅन्सरची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. कोलन कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये ३.२% आणि गुदाशयाच्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये ३.३% वाढ झाली आहे.

प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत
कोलन कॅन्सरला कोलोरेक्टल कॅन्सर असेही म्हणतात. हा मोठ्या आतड्यात आणि गुदाशयात होणारा एक प्रकारचा कॅन्सर आहे. पूर्वी हा कॅन्सर फक्त वयस्कर लोकांना होणारा आजार मानला जात होता. पण, अलिकडच्या वर्षांत तरुणांमध्येही याची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत.
संशोधनात काय समोर आलं?
एका नवीन रिपोर्टनुसार, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका वाढण्यासोबतच विविध प्रकारचे कॅन्सर आढळून आले आहेत. चला तर मग पाहूया संशोधनात काय म्हटलं आहे.
तरुण रुग्णांमध्ये दिसतात घातक लक्षणं
तैवानच्या चांग गुंग मेमोरियल हॉस्पिटलच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. या अभ्यासात असं दिसून आलं की, कोलन कॅन्सर असलेल्या तरुण रुग्णांमध्ये वृद्ध रुग्णांपेक्षा जास्त घातक लक्षणं असतात. तसंच, ५० वर्षांखालील लोकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कॅन्सरचं निदान होण्यास उशीर होऊ शकतो आणि कॅन्सरच्या पेशी अधिक धोकादायक बनू शकतात.
तरुणांमध्ये कोलन कॅन्सरची लक्षणं
कोलन कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये ३.२% तर गुदाशयाच्या कॅन्सरमध्ये ३.३% वाढ झाली आहे. तरुणांमध्ये सुरुवातीची लक्षणं अधिक तीव्र दिसतात, ज्यात गुदाशयातून रक्तस्त्राव, शौचाच्या सवयीत बदल आणि पोटदुखी यांचा समावेश आहे. रुग्ण अनेकदा या लक्षणांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.
हे आहे एक चिंताजनक लक्षण
रिपोर्टनुसार, डॉ. भरत यांनी सांगितले की, गुदाशयातून रक्तस्त्राव हे कोलन कॅन्सरचं मुख्य आणि चिंताजनक लक्षण आहे. पण मूळव्याध, फिशर किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोममध्येही असं होऊ शकतं.
कोलन कॅन्सरची सामान्य लक्षणं
गुदाशयातून सतत रक्तस्त्राव.
शौचातून रक्त पडणे.
शौचाच्या सवयींमध्ये बदल.
पोटदुखी, पोटात मुरडा येणे आणि अस्वस्थता, शारीरिक अशक्तपणा व थकवा.
कोलन कॅन्सर कसा टाळावा?
वजन नियंत्रणात ठेवा.
धूम्रपान टाळा.
निरोगी आहार घ्या.
नियमित व्यायाम करा.
अतिरिक्त मद्यपान आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.

