- Home
- Utility News
- Renault Kwid : महिन्याला फक्त 5 हजारांचा EMI भरा, दसरा-दिवाळीला नवीन स्टायलिश कार आणा घरी!
Renault Kwid : महिन्याला फक्त 5 हजारांचा EMI भरा, दसरा-दिवाळीला नवीन स्टायलिश कार आणा घरी!
Renault Kwid : केंद्र सरकारने आणलेल्या GST बदलांमुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. यामध्ये कमी बजेटच्या गाड्यांचाही समावेश आहे. या नवीन निर्णयामुळे रेनॉल्ट क्विडची किंमत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

नवीन जीएसटी दर
22 सप्टेंबर 2025 पासून रेनॉल्ट क्विडसाठी नवीन जीएसटी दर लागू झाले आहेत. या कपातीमुळे जुन्या किमतींच्या तुलनेत 40 हजार ते 55 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळाली आहे. कोणत्या मॉडेलवर किती सूट आहे ते पाहूया.
* RXE मॅन्युअल व्हेरिएंट: जुनी किंमत ₹4,69,995, नवीन किंमत ₹4,29,900 (सूट ₹40,095)
* RXL(O) मॅन्युअल: जुनी किंमत ₹5,09,995, नवीन किंमत ₹4,66,500 (सूट ₹43,495)
* RXT मॅन्युअल: जुनी किंमत ₹5,54,995, नवीन किंमत ₹4,99,900 (सूट ₹55,095)
* Climber मॅन्युअल: जुनी किंमत ₹5,87,995, नवीन किंमत ₹5,37,900 (सूट ₹50,095)
* Climber DT मॅन्युअल: जुनी किंमत ₹5,99,995, नवीन किंमत ₹5,48,800 (सूट ₹51,195)
* ऑटो (AMT) व्हेरिएंटमध्येही 51 हजार ते 55 हजार रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. सर्वाधिक सूट Climber DT AMT व्हेरिएंटला मिळत आहे.
सुरुवातीच्या किमतीत मोठी घट
जीएसटी कपातीमुळे क्विडची सुरुवातीची किंमत आता फक्त 4.30 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. टक्केवारीनुसार पाहिल्यास, ही कार 9.93% पर्यंत स्वस्त झाली आहे. इतक्या कमी किमतीत 1.0L पेट्रोल व्हेरिएंट उपलब्ध असल्याने क्विड अधिक आकर्षक झाली आहे.
मायलेज आणि फीचर्स
रेनॉल्ट कंपनीनुसार, क्विड प्रति लिटर सुमारे 20 किमी मायलेज देते. त्यामुळे सिटी ड्रायव्हिंग आणि लहान कुटुंबांसाठी हा एक योग्य पर्याय आहे. कमी झालेल्या किमती आणि चांगले मायलेज यामुळे ग्राहकांमध्ये मागणी वाढण्याची शक्यता आहे.
फक्त ५ हजार रुपये भरा
कंपनीच्या वेबसाइटवरील लोन ऑप्शननुसार, बेस व्हेरिएंटची किंमत ₹4.29 लाख आहे. ही कार ₹1.30 लाखांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करता येते. ₹3 लाखांचे कर्ज मिळू शकते. उदाहरणार्थ, 7 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घेतल्यास, महिन्याला फक्त ₹5 हजारांचा EMI भरावा लागेल.
अतिरिक्त खर्चसुद्धा...
मूळ किमतीसोबत ऑन-रोड चार्जेस, ॲक्सेसरीज, इन्शुरन्स, EMI प्रोटेक्शन, जॉब लॉस कव्हर यांसारख्या अतिरिक्त बाबींचाही ग्राहकांनी विचार करावा. या सर्वांमुळे एकूण EMI थोडा वाढू शकतो. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी डीलरकडून अचूक माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

