११,९९९ रुपयांत 7000mAhचा फोन येणार बाजारात, १% बॅटरीवर ६ तास चालणार काम
रिअलमी लवकरच realme Narzo 90 5G आणि realme Narzo 90x 5G हे दोन नवीन फोन लॉन्च करणार आहे. या फोनवर २००० रुपयांची सवलत मिळणार असून, याची सुरुवातीची किंमत ११,९९९ रुपये असेल.

११,९९९ रुपयांत 7000mAhचा फोन येणार बाजारात, १% बॅटरीवर ६ तास चालणार काम
रिअलमी कंपनी दरवेळी नवीन काहीतरी मार्केटमध्ये घेऊन येत असते. या कंपनीचे realme Narzo 90 5G और realme Narzo 90x 5G हे फोन लवकरच मार्केटमध्ये दाखल होणार आहेत.
फोनवर मिळणार २००० रुपयांचा डिस्काउंट
या फोनवर कंपनीकडून २००० रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. या सवलतीनंतर, ६ जीबी रॅम असलेला ५जी फोन ११,९९९ रुपयांना आणि ८ जीबी रॅम असलेला ५जी फोन १३,४९९ रुपयांना खरेदी करता येईल.
फोनची किती आहे किंमत?
Realme Narzo 90X 5G दोन रॅम प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 6GB रॅम प्रकाराची किंमत ₹13,999 आहे, तर 8GB रॅम प्रकाराची किंमत ₹15,499 आहे. सुरुवातीच्या सेल दरम्यान, कंपनी दोन्ही प्रकारांवर ₹2,000 ची फ्लॅट सूट मिळणार आहे.
फोन कमी किंमतीला खरेदी करता येणार?
हा फोन कमी किंमतीला खरेदी करता येणार आहे. ₹२,००० च्या सवलतीनंतर, हा परवडणारा ५G फोन फक्त ₹११,९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. ही ऑफर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, realme.in, तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर मिळू शकते.
फोनमध्ये काय स्पेसिफिकेशन
या फोनमध्ये स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. त्यामध्ये खासकरून Realme Narzo 90X 5G मध्ये 6.8-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 1570 x 720 पिक्सेल आहे. ही पंच-होल-स्टाईल स्क्रीन 144Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1200nits ब्राइटनेस असलेल्या LCD पॅनेलवर बनवली आहे.
फोनमध्ये देण्यात आली मोठी बॅटरी
या फोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये खासकरून 7000mAh Battery देण्यात आली आहे. यामध्ये आपण २३ तासापर्यंत व्हिडीओ पाहू शकणार आहेत. हा फोन १% बॅटरी असताना ७ तास चालू शकणार आहे.

