चेक क्लीअरन्सची ही अपडेट तुम्हाला माहिती आहे का? वाचा नाहीतर राहाल इतरांचा मागे
नवी दिल्ली- चेक बँकेत जमा केल्यानंतर दोन दिवस वाट पहावी लागायची. पण आता काही तासांतच काम होईल. चेक क्लीअरन्सचे नियम RBI ने बदलले आहेत. त्यामुळे चेकचे पैसे लगेच आपल्याला खात्यात जमा करुन मिळणार आहेत.

चेक जमा नियमांमध्ये बदल
पूर्वी, चेक जमा केल्यानंतर बँकेत दोन सलग कामकाजाचे दिवस थांबावे लागायचे. म्हणजे चेक दिल्यानंतर दोन दिवसांनीच पैसे खात्यात जमा व्हायचे आणि चेक क्लिअर होत असे. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हे नियम बदलले आहेत. ४ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू होतील. आता चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवस थांबण्याची गरज नाही, काही तासांतच पैसे खात्यात जमा होतील.
RBI ची घोषणा
RBI ने सांगितले आहे की, चेक ट्रंकेशन सिस्टीमला सतत क्लिअरिंग सेटलमेंटमध्ये बदलण्यात येणार आहे. त्यामुळे चेक क्लिअर होण्याचा वेळ दोन दिवसांवरून काही तासांवर येईल. ही पद्धत जलद व्यवहारासाठी उपयुक्त ठरणार आहे.
४ ऑक्टोबरपासून प्रक्रिया
४ ऑक्टोबरपासून सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बँकेत चेक जमा करता येईल. बँक तो स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसला पाठवेल. तिथून चेकची प्रत संबंधित बँकेत जाईल. कन्फर्मेशन सेशन सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत चालेल. कन्फर्मेशन मिळताच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.
याचे फायदे
चेक क्लिअरिंग फक्त काही तासांत होणार असल्याने अनेकांना फायदा होईल. तातडीच्या वेळी पैसे मिळण्यासाठी दोन दिवस थांबण्याची गरज राहणार नाही. आज चेक दिला तर काही तासांतच तो खात्यात जमा होईल. हे देशातील अनेकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
