RBI Action : या 5 सहकारी बॅंकांवर कठोर कारवाई, तुमचं या बँकेत खातं आहे का?
RBI Action : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पाच राज्यांमधील सरकारी बॅंकांवर दंड आकारण्यात आला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सहकारी बॅंक आहेत का ते जाणून घ्या.

रिझर्व्ह बँकेचा दंड
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा कठोर कारवाई केली आहे. नियम मोडणाऱ्या 5 सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. गृहनिर्माण वित्त, केवायसी आणि सायबर सुरक्षेतील त्रुटींमुळे ही कारवाई झाली.
भारतीय रिझर्व्ह बँक
तेलंगणातील गायत्री सहकारी बँकेला सर्वाधिक १० लाखांचा दंड लावला आहे. विमा उत्पादनांची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुजरातमधील बँकेला २ लाख, तर कर्नाटकातील बँकेला १.५ लाखांचा दंड लावला आहे.
दंड ठोठावण्यात आलेल्या बँका
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्हा बँक आणि तामिळनाडू सर्कल पोस्टल बँकेला प्रत्येकी ५० हजारांचा दंड लावला आहे. केवायसी नियमांचे पालन न करणे आणि जास्त व्याजदराने ठेवी स्वीकारणे हे कारण आहे.
सहकारी बँका
या दंडामुळे ग्राहकांच्या व्यवहारांवर परिणाम होणार नाही, असे RBI ने स्पष्ट केले आहे. ही कारवाई फक्त नियम मोडणाऱ्या बँकांवर केली असून, ग्राहक सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, असेही म्हटले आहे. तसेच इतर बॅंकांनी कायद्याला अनुसरुन काम केले नाही तर कठोर कारवाई केली जाईल, असेही सांगितले आहे.

