- Home
- Utility News
- घर किंवा जमीन विकायचीय? मग 'या' ५ कागदपत्रांशिवाय तुमची डाळ शिजणार नाही; पहा काय आहेत नवे नियम
घर किंवा जमीन विकायचीय? मग 'या' ५ कागदपत्रांशिवाय तुमची डाळ शिजणार नाही; पहा काय आहेत नवे नियम
Property Purchase Legal Process : मालमत्ता खरेदी-विक्री हा केवळ आर्थिक व्यवहार नसून एक कायदेशीर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत विक्री करार (सेल डीड) हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असून, त्याची नोंदणी केल्याशिवाय मालकी हक्क पूर्णपणे हस्तांतरित होत नाही.

मालमत्ता विकायची घाई करू नका! आधी 'हे' ५ पुरावे तपासा
मुंबई : घर किंवा जमीन खरेदी करणे अनेकांसाठी आयुष्यभराचे स्वप्न असते. लोक त्यांच्या संचित कमाईचा भाग खर्च करतात, कर्ज घेतात आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन करतात. त्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री करताना फक्त आर्थिक विचार नाही, तर कायदेशीर बाबींचाही सखोल अभ्यास करणे आवश्यक ठरते. मालमत्ता व्यवहार ही केवळ पैशांची देवाणघेवाण नाही, तर ती पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत योग्य कागदपत्रांची पूर्तता अत्यावश्यक असते.
मालमत्तेच्या व्यवहारासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
मालमत्तेच्या व्यवहारात विविध कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. उदाहरणार्थ, लीज डीड, मॉर्टगेज डीड, गिफ्ट डीड, एक्सचेंज डीड इत्यादी वेगवेगळ्या व्यवहारांसाठी वापरली जातात. मात्र, कायमस्वरूपी विक्रीसाठी सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणजे विक्री करार (सेल डीड / बायनामा). हा दस्तऐवज फक्त व्यवहाराची नोंद नसून मालकी हक्काचा ठोस पुरावा आहे.
विक्री करार म्हणजे काय?
विक्री करार हा कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे विक्रेता आपली मालमत्ता खरेदीदाराच्या नावावर अधिकृतपणे हस्तांतरित करतो. या कराराद्वारे मालकी हक्क, जबाबदाऱ्या आणि स्वामित्व खरेदीदाराकडे जातात. विक्री करार तयार केल्यानंतर त्याची स्थानिक उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी न झाल्यास व्यवहार कायदेशीर दृष्ट्या पूर्ण मानला जात नाही.
बायनामा आणि नोंदणी
बायनामा म्हणजे विक्री कराराची नोंदणी झाल्यानंतर खरेदीदाराचे नाव अधिकृतपणे मालमत्तेच्या नोंदीत येते. विक्रीपत्र विक्रेता आणि खरेदीदार यांच्या परस्पर संमतीने तयार केले जाते. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. नोंदणी करताना मालमत्तेचा संपूर्ण तपशील अचूक नमूद असणे आवश्यक आहे. यामध्ये जमीन किंवा घराचे नकाशे, बिल्डरचे वाटप पत्र, वीज-पाणी युटिलिटी बिले, मालमत्ता कराची पावती आणि आवश्यक असल्यास पॉवर ऑफ अॅटर्नी यांचा समावेश असतो.
सेल डीडचे महत्त्व
सेल डीड हा मालमत्ता व्यवहाराचा अंतिम टप्पा आहे. यामुळे विक्रीची कायदेशीर पुष्टी होते आणि मालकी हक्क विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित होतो. विक्री करार नोंदणीकृत नसल्यास खरेदीदाराला कायदेशीर हक्क मिळत नाही, आणि भविष्यात वाद, फसवणूक किंवा कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात. मालमत्ता खरेदी करताना वरील सर्व दस्तऐवज तपासून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच व्यवहार करणे सुरक्षित ठरते.

