Promise Day 2026 : वचनाची खोली झाडाच्या हिरवाईतून दिसेल! लावा 5 सदाहरित झाडे
Promise Day 2026 Plant Gift Ideas11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जातो. एकमेकांवर विश्वास आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी कपल्स वचन देतात. आयुष्यभर हिरवाईच्या सानिध्यात प्रेम फुलावं, यासाठी घरात काही सदाहरित झाडं आजच्या दिवशी नक्की लावा.

वचनांचा दिवस
Promise Day 2026 Plant Gift Ideas प्रॉमिस डे म्हणजे प्रेम, विश्वास आणि सोबत राहण्याच्या वचनांचा दिवस. या खास दिवशी अनेकजण गिफ्ट्स देतात, पण तुम्हाला जर दीर्घकाळ टिकणारी भेट द्यायची असेल, तर सदाहरित रोपट्यांपेक्षा चांगलं काही नाही. झाडं केवळ घराची शोभा वाढवत नाहीत, तर नात्यांप्रमाणे काळजी आणि संयम शिकवतात. प्रॉमिस डेला ही ५ झाडं लावा.
मनी प्लांट
मनी प्लांट
मनी प्लांटला नात्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि वाढीचं प्रतीक मानलं जातं. हे झाड कमी देखभालीतही वेगाने वाढतं, अगदी प्रेमाप्रमाणे, ज्याला योग्य वातावरण मिळाल्यास ते अधिक घट्ट होत जातं. प्रॉमिस डेला मनी प्लांट लावणं म्हणजे एकत्र पुढे जाण्याचं वचन देण्यासारखं आहे. कमी देखभालीचं हे झाड बेडरूम, ड्रॉईंग रूममध्ये नक्की ठेवा.
स्नेक प्लांट
स्नेक प्लांट
स्नेक प्लांट खूप मजबूत आणि सदाहरित असतो. तो खराब हवा शुद्ध करतो. नात्यांमध्ये हे झाड कठीण परिस्थितीतही सोबत राहण्याचं आणि खंबीरपणे उभं राहण्याचं प्रतीक मानलं जातं. या झाडाला अनेक दिवसांनी पाण्याची गरज लागते. खताशिवायही हे झाड जगू शकतं.
पीस लिली
पीस लिली
पीस लिली शांती, समजूतदारपणा आणि संतुलनाचं प्रतीक आहे. हे झाड नात्यातील भांडणं कमी करून आपापसांत समजूतदारपणा वाढवण्याचा संदेश देतं. प्रॉमिस डेला हे झाड लावणं म्हणजे एकमेकांच्या भावनांचा आदर करण्याचं वचन देण्यासारखं आहे. हे झाड घरात लावल्याने एक सुंदर हिरवळ पसरते.
तुळशीचे रोप
तुळशीचे रोप
तुळस केवळ धार्मिकच नाही, तर नात्यांमधील पवित्रता आणि समर्पणाचं प्रतीकही मानली जाते. प्रॉमिस डेला तुळस लावणं म्हणजे आयुष्यभर एकमेकांची काळजी घेण्याचा आणि सोबत राहण्याचा संकल्प करण्यासारखं आहे. ही सर्व झाडं सदाहरित आहेत. या झाडांना जास्त देखभालीची गरज नसते. फक्त प्रेमाने तुम्ही त्यांना आयुष्यभर आपल्या घरात ठेवू शकता.
एरेका पाम
एरेका पाम
एरेका पाम घरात सकारात्मक ऊर्जा आणि ताजेपणा आणतो. याला इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही ठिकाणी ठेवता येतं. हे झाड सांगतं की, जसं नात्याला मोकळी हवा आणि जागेची गरज असते, तसंच प्रेमही स्वातंत्र्यात फुलतं.

