MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • PPF Scheme : महिन्याला 10 हजार गुंतवा अन् मिळवा 32 लाखांचा फंड, या सरकारी योजनेबद्दल माहितीये?

PPF Scheme : महिन्याला 10 हजार गुंतवा अन् मिळवा 32 लाखांचा फंड, या सरकारी योजनेबद्दल माहितीये?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) या सरकारी योजनेत दरमहा १,०००, ५,००० किंवा १०,००० रुपये गुंतवून १५ वर्षांत तब्बल ३२ लाखांचा फंड कसा उभा करायचा?

2 Min read
Author : Karishma R
Published : Nov 11 2026, 04:11 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडची जादू: दरमहा १००० रुपये गुंतवून मिळवा लाखांचा परतावा
Image Credit : social media

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडची जादू: दरमहा १००० रुपये गुंतवून मिळवा लाखांचा परतावा

नोकरदार आणि छोटे व्यावसायिक नेहमीच आपल्या कष्टाच्या पैशांवर सुरक्षित आणि चांगला परतावा मिळवण्याचा विचार करतात. शेअर बाजाराची जोखीम न घेता सरकारी हमी असलेल्या योजनेत पैसे गुंतवायचे असतील, तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही दर महिन्याला अगदी छोटी रक्कम गुंतवूनही दीर्घकाळात एक मोठा फंड कसा उभा करू शकता, हे आपण पाहूया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
PPF म्हणजे नक्की काय? सध्या किती व्याज मिळतंय?
Image Credit : Asianet News

PPF म्हणजे नक्की काय? सध्या किती व्याज मिळतंय?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही केंद्र सरकारची अत्यंत सुरक्षित आणि लोकप्रिय छोटी बचत योजना आहे. खाजगी बाजारातील चढ-उतारांचा या योजनेवर कोणताही परिणाम होत नाही.

सध्या केंद्र सरकार या योजनेवर ७.१ टक्के वार्षिक व्याज देत आहे. सरकार दर तिमाहीला या अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेत असते. जुलै-सप्टेंबर २०२६ च्या तिमाहीसाठीही केंद्र सरकारने हा ७.१ टक्के व्याजदर कायम ठेवला आहे.

Related Articles

Related image1
SIP Investment : दरमहा 15000 रुपयांची SIP; 15 वर्षांत 1 कोटी रुपये कसे कमवायचे? 15-15-15 चा नियम
Related image2
SIP Vs PPF : दर महिन्याला 3 हजार गुंतवून मिळतील 14 लाख; SIP की PPF? कोणत्या योजनेतून किती फायदा?
36
दर महिन्याला गुंतवणूक केल्यास १५ वर्षांत किती पैसे मिळतील?
Image Credit : Getty

दर महिन्याला गुंतवणूक केल्यास १५ वर्षांत किती पैसे मिळतील?

PPF योजनेचा सुरुवातीचा लॉक-इन पिरीयड १५ वर्षांचा असतो. जर तुम्ही दरमहा ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवत राहिलात, तर १५ वर्षांनंतर मॅच्युरिटीला तुम्हाला किती फंड मिळेल ते पाहूया.

उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा १,००० रुपये गुंतवले, तर १५ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक १,८०,००० रुपये होईल. त्यावर ७.१ टक्के दराने १,४५,२१७ रुपये व्याज मिळून, मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्या हातात जवळपास ३.२५ लाख रुपये येतील.

जर तुम्ही हीच गुंतवणूक दरमहा ५,००० रुपये केली, तर १५ वर्षांत तुम्ही ९,००,००० रुपये जमा कराल. यावर ७,२६,०८५ रुपये व्याज मिळेल आणि तुमच्याकडे तब्बल १६.२७ लाखांचा फंड तयार होईल.

आणखी चांगल्या परताव्यासाठी तुम्ही दरमहा १०,००० रुपये जमा केल्यास, १५ वर्षांत १८,००,००० रुपयांच्या मुद्दलावर जवळपास १४,५२,१७० रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे एकूण ३२.५५ लाखांची मोठी रक्कम तुमच्या पदरात पडेल.

46
PPF योजनेचे महत्त्वाचे नियम कोणते?
Image Credit : Getty

PPF योजनेचे महत्त्वाचे नियम कोणते?

गुंतवणूक मर्यादा: एका आर्थिक वर्षात तुम्ही किमान ५०० ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. एका वर्षात जास्तीत जास्त १२ टप्प्यांत पैसे जमा करण्याची सुविधा यात मिळते.

कालावधी वाढवणे: १५ वर्षांचा मॅच्युरिटी पिरीयड संपल्यानंतरही, तुमची इच्छा असल्यास तुम्ही हे खाते ५-५ वर्षांच्या ब्लॉकनुसार पुढे वाढवू शकता.

56
खरा फायदा... मिळवा ट्रिपल टॅक्स बेनिफिट्स!
Image Credit : Getty

खरा फायदा... मिळवा ट्रिपल टॅक्स बेनिफिट्स!

PPF योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यात मिळणारी करसवलत. ही योजना 'ट्रिपल टॅक्स बेनिफिट' श्रेणीत येते.

पहिली सवलत: तुम्ही PPF मध्ये गुंतवलेल्या रकमेवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स डिडक्शन मिळते.

दुसरी सवलत: या ठेवींवर दरवर्षी जमा होणाऱ्या व्याजावर कोणताही कर आकारला जात नाही.

तिसरी सवलत: १५ वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्ही काढलेली संपूर्ण रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असते.

66
आपत्कालीन गरजांसाठी लोन आणि विथड्रॉवलचा पर्याय
Image Credit : PR

आपत्कालीन गरजांसाठी लोन आणि विथड्रॉवलचा पर्याय

PPF खाते उघडल्यानंतर जर तुम्हाला तातडीने पैशांची गरज भासली, तर खाते बंद करण्याची गरज नाही. नियमांनुसार तुमच्या PPF खात्यातील बॅलन्सवर तुम्ही कर्ज घेऊ शकता. तसेच काही विशिष्ट अटींच्या अधीन राहून १५ वर्षांपूर्वीच काही प्रमाणात पैसे काढण्याची सुविधाही सरकार देते. सुरक्षित भविष्य, मुलांचे शिक्षण किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी दीर्घकाळात चक्रवाढ व्याजाच्या जादूने मोठी रक्कम जमा करायची असेल, तर PPF हा एक उत्तम पर्याय आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Online Shopping Tips : ऑनलाईन मोबाईल, लॅपटॉप विकत घेताय? बॉक्स उघडण्यापूर्वी ही 3 कामं नक्की करा
Recommended image2
Safety Helmets : फॅक्टरी आणि साइटवर कामगारांच्या हेल्मेटच्या रंगांचा अर्थ काय असतो? जाणून घ्या
Recommended image3
Sunroof Cars : 10 लाखांच्या आत सनरूफ असलेल्या बेस्ट कार्स
Recommended image4
EPFO Pension Hike : ईपीएफओ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार?
Recommended image5
Post Office RD Scheme : पोस्ट ऑफिस RD मध्ये दरमहा 2,000 गुंतवल्यास 5 वर्षांत किती मिळतील?
Related Stories
Recommended image1
SIP Investment : दरमहा 15000 रुपयांची SIP; 15 वर्षांत 1 कोटी रुपये कसे कमवायचे? 15-15-15 चा नियम
Recommended image2
SIP Vs PPF : दर महिन्याला 3 हजार गुंतवून मिळतील 14 लाख; SIP की PPF? कोणत्या योजनेतून किती फायदा?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved