MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Post Office vs SBI RD : दर महिन्याला 10 हजार गुंतवा आणि मिळवा 17 लाख, कुठे मिळतोय जास्त फायदा?

Post Office vs SBI RD : दर महिन्याला 10 हजार गुंतवा आणि मिळवा 17 लाख, कुठे मिळतोय जास्त फायदा?

Post Office RD vs SBI RD: सुरक्षित परतावा आणि बचतीसाठी रिकरिंग डिपॉझिट (RD) हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून भविष्यासाठी मोठा फंड तयार करू शकता. पण, पोस्ट ऑफिस आणि SBI यापैकी नेमका कोणता पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे?

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 27 2026, 09:52 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
रिस्क न घेता बंपर रिटर्न्स.. RD साठी बेस्ट ऑप्शन कोणता?
Image Credit : Chatgpt

रिस्क न घेता बंपर रिटर्न्स.. RD साठी बेस्ट ऑप्शन कोणता?

तुम्हाला कोणतीही रिस्क न घेता दर महिन्याला थोडी थोडी बचत करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा आहे का? तर मग रिकरिंग डिपॉझिट (RD) हा तुमच्यासाठी एक भारी फायनान्शियल ऑप्शन आहे. भारतीय टपाल विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या दोन्ही ठिकाणी ग्राहकांना RD ची सुविधा मिळते. पण या दोन्ही संस्थांचे व्याजदर वेगवेगळे आहेत. त्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्या हातात येणारी रक्कमही बदलते.

सध्याच्या नियमांनुसार, जर तुम्ही दर महिन्याला १०,००० रुपये सलग १० वर्षे गुंतवले, तर कोणत्या स्कीममध्ये जास्त पैसे मिळतील, याचं संपूर्ण गणित आपण इथे पाहणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पोस्ट ऑफिस RD चे नियम आणि व्याजदर
Image Credit : Getty

पोस्ट ऑफिस RD चे नियम आणि व्याजदर

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिटवर सध्या वार्षिक ६.७ टक्के व्याजदर मिळतोय. हे व्याज दर तिमाहीला कंपाऊंड होते. या स्कीमचा मूळ कालावधी फक्त ५ वर्षांचा असतो. पण, गुंतवणूकदारांना हवं असल्यास मॅच्युरिटीनंतर ते आणखी ५ वर्षांसाठी ही स्कीम वाढवू शकतात. केंद्र सरकारचा थेट पाठिंबा असल्यामुळे, यात केलेली गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

Related Articles

Related image1
SBI Cash Withdrawal Charges : SBI मध्ये तुमचं खातं आहे का? महिन्यातून किती वेळा फ्री पैसे काढता येतील? नियम काय?
Related image2
EPF Withdrawal : नोकरी सोडल्यावर पीएफचे पूर्ण पैसे काढायचेत? आता 1 वर्ष वाट पाहावी लागणार
35
SBI RD चे नियम आणि व्याजदर
Image Credit : Asianet News

SBI RD चे नियम आणि व्याजदर

दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सामान्य नागरिकांना RD वर सध्या वार्षिक ६.५ टक्के व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना यापेक्षा थोडं जास्त व्याज मिळतं. बँकेच्या रिकरिंग डिपॉझिटमध्येही तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. ठरलेली मुदत संपल्यानंतर मुद्दल आणि व्याज मिळून संपूर्ण रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होते.

दर महिन्याला १०,००० रुपये गुंतवल्यास किती फंड तयार होईल?

समजा, एका व्यक्तीने सलग १० वर्षे दर महिन्याला १०,००० रुपयांची बचत केली..

• मासिक गुंतवणूक: १०,००० रुपये

• एकूण कालावधी: १० वर्षे (१२० महिने)

• तुमची एकूण गुंतवणूक: १२,००,००० रुपये (१२ लाख रुपये)

45
पोस्ट ऑफिस RD विरुद्ध SBI RD
Image Credit : Gemini AI

पोस्ट ऑफिस RD विरुद्ध SBI RD

या रकमेवर पोस्ट ऑफिस आणि SBI च्या स्कीममध्ये मिळणाऱ्या अंदाजित मॅच्युरिटीमधील फरक पाहूया..

पोस्ट ऑफिस RD चं गणित

• मासिक गुंतवणूक: १०,००० रुपये

• एकूण गुंतवणूक: १२,००,००० रुपये

• व्याजदर: वार्षिक ६.७%

अंदाजित मॅच्युरिटी रक्कम: सुमारे १७.२ लाख रुपये. म्हणजेच, १० वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदाराला फक्त व्याजाच्या रूपात जवळपास ५.२ लाख रुपयांचा फायदा मिळतो.

SBI RD चं गणित

• मासिक गुंतवणूक: १०,००० रुपये

• एकूण गुंतवणूक: १२,००,००० रुपये

• व्याजदर: वार्षिक ६.५%

अंदाजित मॅच्युरिटी रक्कम: सुमारे १७ लाख रुपये. म्हणजेच, यात गुंतवणूकदाराला जवळपास ५ लाख रुपयांपर्यंत व्याज मिळतं.

55
कोणत्या स्कीममध्ये जास्त फायदा आहे?
Image Credit : Getty

कोणत्या स्कीममध्ये जास्त फायदा आहे?

सध्याच्या व्याजदरांची तुलना केली, तर SBI RD च्या तुलनेत पोस्ट ऑफिस RD मध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना जवळपास २०,००० ते ३०,००० रुपये अतिरिक्त मॅच्युरिटी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. SBI पेक्षा पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवर मिळणारा व्याजदर थोडा जास्त असणं, हेच यामागचं मुख्य कारण आहे.

टीप: हे गणित फक्त माहितीसाठी दिले आहे. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः माहितीची खात्री करून घेणे केव्हाही चांगले.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Bank Strike : आज बँका सुरू राहणार; उद्यापासून 3 दिवस संप, एटीएम व्यवहारांवर चार्ज नाही
Recommended image2
QR Code Scam : क्यूआर कोड स्कॅन करताय? एका क्लिकवर बँक खातं होऊ शकतं रिकामं!
Recommended image3
Vitamin C Serum: चेहऱ्याचा हरवलेला ग्लो परत मिळवायचाय? घरीच बनवा हे सीरम, एका आठवड्यात त्वचा चमकेल
Recommended image4
Cancer Prevention: कॅन्सरचा धोका कसा कमी करायचा? आजच या ६ सवयी लावून घ्या
Recommended image5
Earphone Hacks : खिशात इयरफोनच्या वायरचा गुंता होतोय? मग या सोप्या ट्रिक्स नक्की ट्राय करा
Related Stories
Recommended image1
SBI Cash Withdrawal Charges : SBI मध्ये तुमचं खातं आहे का? महिन्यातून किती वेळा फ्री पैसे काढता येतील? नियम काय?
Recommended image2
EPF Withdrawal : नोकरी सोडल्यावर पीएफचे पूर्ण पैसे काढायचेत? आता 1 वर्ष वाट पाहावी लागणार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved