- Home
- Utility News
- PM Kisan Yojana : काय दुप्पट होणार का पीएम किसान योजनेची रक्कम? सरकारने संसदेत दिले स्पष्ट उत्तर, जाणून घ्या 21वी हप्त्याची तारीख
PM Kisan Yojana : काय दुप्पट होणार का पीएम किसान योजनेची रक्कम? सरकारने संसदेत दिले स्पष्ट उत्तर, जाणून घ्या 21वी हप्त्याची तारीख
PM Kisan Yojana : PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 ची आर्थिक मदत मिळते. सरकारने स्पष्ट केले की सध्या ही रक्कम दुप्पट करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. 20 वा हप्ता वितरित झाल्यानंतर, 21व्या हप्त्याची रक्कम नोव्हेंबर 2025 मध्ये मिळण्याची शक्यता आहे

दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही देशातील लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. अलीकडेच या योजनेची 20वी हप्त्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे की सरकार ही रक्कम दुप्पट करण्याच्या तयारीत आहे. पण खरी स्थिती काय आहे, हे जाणून घेऊया...
सरकारने दिले स्पष्ट उत्तर
केंद्र सरकारने संसदेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, सध्या पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. म्हणजेच, शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्येच मिळत राहील.
पीएम किसान योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही भारत सरकारची एक केंद्रीय योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते. ही योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाली आणि फेब्रुवारी 2019 पासून संपूर्ण देशभर लागू करण्यात आली. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, शेतीसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये मदत करणे आणि सावकारांपासून दूर ठेवणे आहे.
21वी हप्त्याची तारीख कधी?
केंद्र सरकारने 2 ऑगस्ट 2025 रोजी पीएम किसान योजनेची 20वी हप्त्याची रक्कम वितरित केली. त्यामुळे आता 21व्या हप्त्याची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. अद्याप सरकारने अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली, तरी मागील हप्त्यांच्या वेळापत्रकावरून अंदाज लावता येतो की, 21वी हप्त्याची रक्कम नोव्हेंबर 2025 मध्ये दिली जाऊ शकते.

