- Home
- Utility News
- PM Kisan Yojana: PM किसान योजनेचे ₹2,000 खात्यात जमा झाले नाहीत? लाखो शेतकरी चिंतेत! या मोठ्या चुका तपासा आणि पैसे मिळवा!
PM Kisan Yojana: PM किसान योजनेचे ₹2,000 खात्यात जमा झाले नाहीत? लाखो शेतकरी चिंतेत! या मोठ्या चुका तपासा आणि पैसे मिळवा!
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामागे ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक खात्यातील त्रुटी आणि अर्जातील चुकीची माहिती यांसारखी प्रमुख कारणे आहेत. या चुका कशा दुरुस्त करावा.

PM किसान योजनेचे ₹2,000 खात्यात जमा झाले नाहीत?
PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. 2019 साली सुरू झालेल्या या योजनेनुसार रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. योजनेंचा 21 वा हप्ता सोमवारी देशभरातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. तामिळनाडूतील कोयंबटूर येथे झालेल्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जारी केला. या माध्यमातून 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा झाले. अनेक शेतकऱ्यांनी यामुळे मोठा दिलासा व्यक्त केला.
बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हप्ता पुढे ढकलण्याच्या चर्चा होत्या; परंतु केंद्र सरकारने नियोजित वेळापत्रकानुसारच 19 नोव्हेंबर रोजीच रक्कम जारी केली. मात्र, यामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. अनेकांना प्रश्न पडला “आमच्या खात्यात 2,000 रुपये का आले नाहीत?” याची मुख्य कारणे कोणती, आणि ती कशी दुरुस्त करायची ते पाहूयात.
का थांबला 21वा हप्ता? प्रमुख कारणे
1. ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण
पीएम किसान योजनेत e-KYC करणे अनिवार्य आहे.
e-KYC पूर्ण नसल्यास हप्ता आपोआप थांबतो.
2. बँक खात्यातील त्रुटी
अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये खालील समस्या आढळल्या
खाते बंद असणे
IFSC कोड बदलणे
खाते आधारशी जोडलेले नसणे
या त्रुटींमुळे डीबीटी पेमेंट फेल होऊन रक्कम जमा होत नाही.
3. अर्जातील चुकीची माहिती
योजनेसाठी अर्ज करताना आढळणाऱ्या प्रमुख चुका
नावातील स्पेलिंग चूक
चुकीचे जेंडर
कागदपत्रांची अपूर्ण किंवा चुकीची नोंद
आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावात विसंगती
या चुकांमुळे हप्ता रोखला जातो आणि नोंद सुधारणे आवश्यक होते.
शेतकऱ्यांनी काय करावे?
पीएम किसान पोर्टलवर जाऊन स्टेटस तपासा
जवळच्या CSC केंद्रावर e-KYC पूर्ण करा
बँक खाते आधारशी लिंक करा
चुकीची कागदपत्रे व माहिती दुरुस्त करा
जमाबंदी/7/12 नोंदी सत्यापित करा
पीएम किसान योजना काय आहे?
2019 साली सुरू झालेल्या या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मदत मिळते. ही रक्कम तीन समान हप्त्यांत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

