- Home
- Utility News
- PM Kisan Yojana Update: PM Kisan चा २१वा हप्ता मिळणार पण कधी? दिवाळीत नाही, आता जाणून घ्या नवीन अपडेट!
PM Kisan Yojana Update: PM Kisan चा २१वा हप्ता मिळणार पण कधी? दिवाळीत नाही, आता जाणून घ्या नवीन अपडेट!
PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. दिवाळीपूर्वी हप्ता मिळण्याची आशा फोल ठरली असली तरी, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

PM Kisan चा २१वा हप्ता नेमका कधी मिळणार?
मुंबई: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनेकांना दिवाळीपूर्वी हप्ता मिळेल अशी आशा होती, मात्र केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा न झाल्यामुळे या अपेक्षांना तात्पुरता झटका बसला आहे.
कधी मिळणार हप्ता?
मिळालेल्या माध्यमांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. सध्या यासंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिहारमध्ये निवडणुका ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होईल. या पार्श्वभूमीवर हप्त्याच्या वितरणासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
आचारसंहितेचा परिणाम होणार का?
बिहारमध्ये सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की, अशा काळात हप्ता मिळणार का? उत्तर आहे होय!
आचारसंहिता लागू असताना नवीन योजना जाहीर करता येत नाहीत, मात्र पूर्वीपासून सुरू असलेल्या योजनांतील निधी वितरणावर बंदी नाही. त्यामुळे PM Kisan सारख्या नियमित योजनेतून हप्त्याचे पैसे देणे कायदेशीरदृष्ट्या परवानगी योग्य आहे.
कुठल्या राज्यांमध्ये हप्ता मिळाला?
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतेच जाहीर केले की, २६ सप्टेंबर २०२५ रोजी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील काही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये २१व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. विशेषतः पूरग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
आता पुढील टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि इतर उर्वरित राज्यांतील लाभार्थ्यांना देखील लवकरच हप्ता वितरित केला जाईल, अशी माहिती आहे.
दिवाळी नाही, पण नोव्हेंबरमध्ये नक्की!
या वर्षी अनेक शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी हप्ता मिळेल अशी आशा होती. मात्र सध्याच्या घडामोडींनुसार, नोव्हेंबरमध्ये हप्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असली तरी, दिलासा लवकरच मिळण्याची चिन्हे आहेत.

