- Home
- Utility News
- PM Kisan 21st Installment Update: PM किसान योजनेचा 21 वा हप्ता लवकरच खात्यात! पण 'ही' चूक केलीत, तर पैसे अडकणार
PM Kisan 21st Installment Update: PM किसान योजनेचा 21 वा हप्ता लवकरच खात्यात! पण 'ही' चूक केलीत, तर पैसे अडकणार
PM Kisan 21st Installment Update: पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता ऑक्टोबर 2025 मध्ये अपेक्षित आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तथापि, ई-केवायसी, मोबाईल नंबर किंवा बँक तपशील अपडेट नसल्यास पेमेंट थांबू शकते.

PM किसान योजनेचा 21 वा हप्ता लवकरच येणार
मुंबई: पीएम किसान सन्मान निधी योजनेतून दरवर्षी 6,000 रुपयांची मदत मिळणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या योजनेचा 21 वा हप्ता ऑक्टोबर 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, एक छोटीशी चूक तुमचं पेमेंट थांबवू शकते!
21 व्या हप्त्याची उत्सुकता शिगेला!
सरकारने आतापर्यंत 20 हप्ते यशस्वीपणे वितरित केले असून, शेतकऱ्यांचे खाते दरवेळी 2,000 रुपयांनी तीन टप्प्यांत भरले जाते. 21 व्या हप्त्यामुळे रब्बी हंगामाच्या तयारीसाठी तसेच दिवाळीच्या खर्चासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु, काही शेतकऱ्यांचे हप्ते थांबले असल्याचं निदर्शनास आलं असून, त्यामागचं कारण ई-केवायसी, मोबाईल नंबर किंवा बँक तपशील अपडेट नसणे हे आहे.
मोबाईल नंबर आणि बँक डिटेल्स तपासणे का गरजेचं?
"OTP न मिळाल्याने किंवा चुकीच्या खात्याच्या माहितीतून पेमेंट प्रक्रियेत अडथळे येतात," असं कृषी मंत्रालयाचं स्पष्ट मत आहे.
जर तुम्ही मोबाईल नंबर बदलला असेल, तर तो लगेच अपडेट करा.
pmkisan.gov.in वर जा
"Farmers Corner" "Update Mobile Number" वर क्लिक करा
आधार क्रमांक टाका, OTP पडताळा आणि नवीन नंबर सेव्ह करा
टीप: मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणे अत्यावश्यक आहे.
लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे का?
pmkisan.gov.in ला भेट द्या
"Beneficiary Status" या पर्यायावर क्लिक करा
आधार क्रमांक किंवा बँक अकाउंट नंबर टाका
संपूर्ण पेमेंट स्टेटस आणि पुढील हप्त्याची माहिती मिळवा
e-KYC पूर्ण केली का?
PM किसान योजनेत सहभागी राहण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे.
संकेतस्थळावरील Farmers Corner मध्ये जा
e-KYC वर क्लिक करा
आधार क्रमांक टाका आणि OTP पडताळून प्रक्रिया पूर्ण करा
फसव्या मेसेजपासून सावध रहा!
सरकारने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. WhatsApp, SMS किंवा सोशल मीडियावरून येणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
सरकार कधीही SMS किंवा WhatsApp द्वारे वैयक्तिक माहिती मागवत नाही.
कुठलीही शंका असल्यास खालील हेल्पलाइनवर संपर्क साधा.
155261
011-24300606
महत्वाची सूचना
मोबाइल नंबर, बँक डिटेल्स आणि ई-केवायसी अपडेट करा
लाभार्थी यादीत नाव आहे का ते तपासा
फसव्या मेसेजपासून सावध रहा
वेळेत सगळी माहिती अपडेट केल्यास 21 वा हप्ता खात्यात वेळेवर जमा होईल

