- Home
- Utility News
- PM Kisan 21 Installment: मोठी बातमी! दिवाळीनंतर येणार PM Kisan योजनेचा २१वा हप्ता, पण 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही ₹२,०००
PM Kisan 21 Installment: मोठी बातमी! दिवाळीनंतर येणार PM Kisan योजनेचा २१वा हप्ता, पण 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही ₹२,०००
PM Kisan 21 Installment: PM किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे. सरकारने पात्रता तपासणी कठोर केल्याने ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, जमीन पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांना हप्त्याचा लाभ मिळणार नाही

पीएम किसानचा 21 वा हप्ता दिवाळीनंतर खात्यात
मुंबई: देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 21 व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आधी असा अंदाज होता की दिवाळीपूर्वीच रक्कम खात्यात जमा होईल, पण आता कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार हा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
तथापि, काही शेतकरी यंदाच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. कारण सरकारने पात्रता तपासणी अधिक काटेकोर केली असून, ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रं चुकीची आहेत किंवा ज्यांनी ई-केवायसी आणि जमीन पडताळणी पूर्ण केली नाही, त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
PM-KISAN योजना, थेट आर्थिक सहाय्य
या योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षातून तीन वेळा प्रत्येकी ₹2,000 म्हणजेच एकूण ₹6,000 थेट बँक खात्यात जमा केले जातात. सरकारने आतापर्यंत 20 हप्त्यांचे वितरण पूर्ण केले आहे आणि आता 21 व्या हप्त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
‘या’ कारणांमुळे शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही
केंद्र सरकारने अलीकडेच अशा शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे जे
चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी केलेली आहे
अपात्र असूनही लाभ घेतलेला आहे
ज्यांनी ई-केवायसी किंवा जमीन पडताळणी अद्याप पूर्ण केलेली नाही
अशा शेतकऱ्यांचे अर्ज रद्द केले जाऊ शकतात आणि पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये आधी जमा झालेली रक्कमही परत मागवली जाऊ शकते.
ई-केवायसी, वेळेत करा अन्यथा हप्ता अडकेल
ई-केवायसीद्वारे शेतकऱ्याचे आधार व बँक खाते यामधील संबंधांची खातरजमा केली जाते. हे केल्याने निधी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो व फसवणूक टाळता येते. सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, ई-केवायसी पूर्ण न केल्यास हप्ता रोखला जाईल. त्यामुळे CSC केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाइन पोर्टलवरून ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
जमीन पडताळणीचे महत्त्व
शेतकऱ्याची मालकीची शेती आहे का, तिचे क्षेत्रफळ किती आहे, ती शेतीयोग्य आहे का, हे तपासण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून ही पडताळणी केली जाते. अद्ययावत नोंदी नसल्यास अर्ज अपात्र ठरतो. कृषी विभागाचा सल्ला: शेतकऱ्यांनी आपली जमीन माहिती मिसळ नोंदणी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात पडताळून घ्यावी.
हप्त्याची संभाव्य तारीख
अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
लाभ मिळवायचा आहे? ही कामं आत्ताच पूर्ण करा!
ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करा
जमिनीची पडताळणी अद्ययावत करा
बँक खात्यात आधार लिंक आहे का, तपासा
बनावट कागदपत्रांपासून दूर राहा

