MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • PM Kisan Yojana 21th Installment: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 21वा हप्ता, केंद्र सरकारकडून नवीन नियम जाहीर

PM Kisan Yojana 21th Installment: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 21वा हप्ता, केंद्र सरकारकडून नवीन नियम जाहीर

PM Kisan Yojana 21th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राज्यांना लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Oct 30 2025, 06:29 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!
Image Credit : iSTOCK

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!

नवी दिल्ली: देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आवश्यक सूचना दिल्या असून, पात्र लाभार्थ्यांना वेळेत पैसे मिळावेत यासाठी तयारी जोमात सुरू आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
पीएम किसान योजना काय आहे?
Image Credit : iSTOCK

पीएम किसान योजना काय आहे?

फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केली जाते. सध्या 10 कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

Related Articles

Related image1
Pune Night Bus Service: पुणेकरांसाठी खुशखबर! रात्रीची चिंता संपली; ‘या’ 6 मार्गांवर धावणार पीएमपीची सुरक्षित ‘रातराणी’ सेवा
Related image2
Pandarapur Kartik Ekadashi Special Trains: वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरकडे धावणार विशेष रेल्वे, मध्य रेल्वेने जाहीर केलं वेळापत्रक
38
21वा हप्ता कधी येणार?
Image Credit : iSTOCK

21वा हप्ता कधी येणार?

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. पूर्वी दिवाळीपूर्वी पैसे येतील अशी अपेक्षा होती, परंतु आता बिहार निवडणुकीपूर्वी (6 नोव्हेंबरपासून सुरू) रक्कम वितरित होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. 

48
कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं वक्तव्य
Image Credit : iSTOCK

कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं वक्तव्य

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, “पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ₹2,000 जमा केले जातील. सर्व राज्यांनी ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि जमीन नोंदींची पडताळणी तातडीने पूर्ण करावी.” त्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत, त्यांनाही लाभ मिळण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. 

58
काही राज्यांना आधीच निधी
Image Credit : iSTOCK

काही राज्यांना आधीच निधी

काही राज्यांमध्ये आधीच हप्ता वितरित झाला आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आली. 7 ऑक्टोबर 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील 8.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹171 कोटी जमा झाले. उर्वरित राज्यांना निधी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळेल अशी अपेक्षा आहे. 

68
या शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता
Image Credit : iSTOCK

या शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता

पुढील कारणांमुळे काही शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही.

ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण

आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे

बँक खात्याचे तपशील चुकीचे किंवा अपूर्ण असणे

राज्य सरकारांना पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून यादी केंद्राकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

78
निवडणूक आणि हप्ता वितरण
Image Credit : Getty

निवडणूक आणि हप्ता वितरण

बिहारमध्ये सध्या आचारसंहिता लागू आहे, मात्र सुरू असलेल्या योजनांचे हप्ते देण्यावर बंदी नाही. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यास, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 जमा होण्याची शक्यता आहे. 

88
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
Image Credit : Asianet News

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

जर तुमचं ई-केवायसी, आधार लिंकिंग, किंवा बँक खाते तपशील अद्ययावत नसतील, तर तात्काळ पूर्ण करा. अन्यथा तुमचा 21वा हप्ता अडकू शकतो. केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम जमा होईल.

PM Kisan योजनेचा पुढील हप्ता काही दिवसांतच येणार आहे. सरकारकडून सर्व तयारी पूर्ण असून, वेळेवर निधी मिळावा यासाठी राज्य प्रशासन सतर्क आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रं लगेच तपासा आणि लाभ मिळवण्यासाठी सज्ज राहा!

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Low Seat Scooters : 90 हजारांच्या आत मिळणाऱ्या 5 हलक्या आणि लो-सीट स्कूटर्स
Recommended image2
TV Industry Jobs : टीव्ही क्षेत्रात नोकरकपात? बार्क बंद पडल्यास हजारो कर्मचाऱ्यांवर येणार गंडांतर
Recommended image3
Train Wheels : ट्रेनची चाकं किती दिवसांनी घासली जातात? ती कधी बदलतात?
Recommended image4
Budget Automatic Cars : 5 लाखांच्या आत ऑटोमॅटिक कार शोधताय? या हॅचबॅक कार्स नक्की पाहा
Recommended image5
Diwali Bonus Investment : दिवाळीच्या बोनसचे पैसे या पद्धतीने गुंतवा, अडीअडचणींना येतील कामी
Related Stories
Recommended image1
Pune Night Bus Service: पुणेकरांसाठी खुशखबर! रात्रीची चिंता संपली; ‘या’ 6 मार्गांवर धावणार पीएमपीची सुरक्षित ‘रातराणी’ सेवा
Recommended image2
Pandarapur Kartik Ekadashi Special Trains: वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरकडे धावणार विशेष रेल्वे, मध्य रेल्वेने जाहीर केलं वेळापत्रक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved