Parenting Tips : आई मुलांसमोर रडली तर काय होतं? मुलांच्या मनावर असा होतो परिणाम!
Parenting Tips : अनेक पालकांना आपल्या मुलांसमोर दुःखी व्हायला किंवा रडायला आवडत नाही. पण, मुलांनाही आपले पालक रडलेले सहन होत नाही. विशेषतः आई रडलेली तर ते अजिबात सहन करू शकत नाहीत.

पालकत्वाच्या टिप्स
आयुष्य नेहमी सारखं नसतं. सुख-दुःख येतंच राहतं. दुःख झाल्यावर रडू येणं स्वाभाविक आहे. पण, पालकांना मुलांसमोर रडायला आवडत नाही. कारण त्याचा लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होतो. त्यांना मोठा धक्का बसतो. मुलांना पालक, विशेषतः आई रडलेली सहन होत नाही.
आई आणि मुलांमधील नातं...
मुलांचं आईवर खूप प्रेम असतं. आई दुःखी झालेली त्यांना बघवत नाही. आई रडल्यास ते अधिकच दुःखी होतात. जवळजवळ सर्व मुलं आईला मिठी मारून तिचे अश्रू पुसतात. यामुळे आई-मुलांमधील नातं अधिक घट्ट होतं. पण त्याचे मनही खिन्न होतं. त्यांच्या आयुष्यात निराशा पसरते. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. ते कमकुवत होतात.
भावनिक संवेदनशीलता...
मुलांसमोर आई सातत्याने रडत असेल तर मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात. लहान-मोठ्या संकटात सहज हार मानतात. संकटांवर मात करण्याची त्यांची वृत्ती मागे पडते. म्हणजेच ते मानसिक दुबळे होतात. तसेच ते अनेक संकटांना घाबरु लागतात.
नकारात्मक परिणाम
आईच्या रडण्याचे सकारात्मकपेक्षा नकारात्मक परिणाम जास्त होतात. पालक सतत मुलांसमोर रडल्यास मुलांमध्ये असुरक्षितता, चिंता आणि भीतीची भावना निर्माण होते. लहान मुलांना पालक का रडत आहेत हे समजत नाही. त्यांच्यावर याचा जबर आघात होतो.
तुम्ही रडताना मुलांनी पाहिल्यास...
तुम्ही रडताना मुलांनी पाहिल्यास, कारण लपवण्याऐवजी त्यांच्याशी बोला. यामुळे मुलांची भावनिक समज वाढते. आयुष्यात आव्हानं येतात आणि त्यांना सामोरं जाणं महत्त्वाचं आहे, हे मुलांना समजावून सांगा. पण शक्यतोवर त्यांच्यासमोर रडू नका. तुम्ही कितीही समजून सांगितले तरी त्यांना त्या गोष्टी पटत नाहीत.
खोटी कारणे सांगू नका...
मुलांनी रडताना पाहून 'काय झालं?' विचारल्यास, 'काही नाही, सगळं ठीक आहे' असं खोटं बोलू नका. चुकीची कारणं देऊ नका. यामुळे ते गोंधळतात. मुलांशी नेहमी खरं बोला, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

