- Home
- Utility News
- ONGC Apprentice Recruitment 2025: नोकरी हवीये? ना परीक्षा ना धावपळ, 2700+ जागांसाठी संधी; आजच अर्ज करा!
ONGC Apprentice Recruitment 2025: नोकरी हवीये? ना परीक्षा ना धावपळ, 2700+ जागांसाठी संधी; आजच अर्ज करा!
ONGC Recruitment 2025: ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने 2743 अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे, ज्यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणांवर आधारित गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.

ONGC मधून तुमच्या करिअरला सुरुवात करा!
ONGC Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी! भारत सरकारच्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) कडून तब्बल 2743 अप्रेंटिस पदांवर जम्बो भरती सुरू झाली आहे आणि विशेष म्हणजे, कोणतीही लेखी परीक्षा नाही!
या भरतीमधून ट्रेड, टेक्निकल आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून, शैक्षणिक गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार होणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
या अप्रेंटिसशिप अंतर्गत विविध विभागांत खालीलप्रमाणे भरती होणार आहे.
लायब्ररी असिस्टंट
फायर सेफ्टी टेक्निशियन
लॅब केमिस्ट / अॅनालिस्ट (Petroleum Products)
अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह / HR / Computer Science Executive
COPA (Computer Operator & Programming Assistant)
इलेक्ट्रिशियन, फिटर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक इत्यादी.
पात्रता काय असावी?
किमान 10वी/12वी उत्तीर्ण
संबंधित ट्रेडसाठी: ITI / डिप्लोमा / B.Com / B.Sc / BBA / BE / B.Tech आवश्यक
वयोमर्यादा: 18 ते 24 वर्षे (6 नोव्हेंबर 2025 रोजी गणना)
SC/ST: 5 वर्षांची सूट
OBC: 3 वर्षांची सूट
दिव्यांग: 10 वर्षांची सूट
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू: 16 ऑक्टोबर 2025
अंतिम तारीख: 6 नोव्हेंबर 2025
गुणवत्ता यादी जाहीर: 26 नोव्हेंबर 2025
स्टायपेंड किती?
Graduate Apprentice: ₹12,300/-
Diploma Apprentice: ₹10,900/-
Trade Apprentice: ₹8,200 ते ₹10,560/-
अर्ज कसा कराल?
अधिकृत वेबसाइटवर जा
https://nats.education.gov.in
https://www.apprenticeshipindia.gov.in
“Apply Online” वर क्लिक करा
सर्व आवश्यक माहिती भरून, कागदपत्र, फोटो, स्वाक्षरी अपलोड करा
शुल्क (जर लागू असेल तर) भरा
अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा
सरकारी नोकरी हवीये पण परीक्षा नकोय? मग ही संधी गमावू नका
कोणतीही परीक्षा नाही!
निवड केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर
सरकारी कंपनीत अनुभवाची उत्तम संधी