Nissan X Trail India Sales Drop To Zero : निसानची प्रीमियम एसयूव्ही एक्स-ट्रेलची भारतातील विक्री गेल्या पाच महिन्यांपासून शून्य आहे. त्यामुळे कंपनीची चिंता वाढली आहे. काही कारणांमुळे कंपनीच्या कार विक्रीला फटका बसला आहे.

Nissan X Trail India Sales Drop To Zero : जापनीज वाहन ब्रँड निसानची प्रीमियम एसयूव्ही एक्स-ट्रेल भारतीय बाजारात सेल्ससाठी संघर्ष करत असल्याचे वृत्त आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये या एसयूव्हीची एकही युनिट विकला गेला नाही. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून विक्री शून्य युनिट्सवर कायम आहे. 

गेल्या सहा महिन्यांच्या विक्रीची आकडेवारी

  • मे 2025 - 20
  • जून 2025 - 0
  • जुलै 2025 - 0
  • ऑगस्ट 2025 - 0
  • सप्टेंबर 2025 - 0
  • ऑक्टोबर 2025 - 0

वरील तक्त्यावरून दिसून येते की मे 2025 मध्ये 20 युनिट्स विकल्यानंतर, गाडीच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. मे 2025 नंतर तर विक्रीचे खातेही उघडलेले नाही.

निसान एक्स-ट्रेल ही एक D1-सेगमेंट एसयूव्ही आहे, जी भारतीय ग्राहकांना प्रीमियम अनुभव देण्याच्या उद्देशाने निसानने सादर केली आहे. यात आधुनिक लूक आणि ग्लोबल डिझाइन ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हायब्रीड तंत्रज्ञान (आंतरराष्ट्रीय आवृत्तीत), एकाधिक ड्रायव्हिंग मोड्स आणि 4WD पर्याय यांचा यात समावेश आहे. प्रीमियम इंटीरियर आणि प्रगत वैशिष्ट्येही यात मिळतात.

कंपनीला असा बसला फटका

एवढी वैशिष्ट्ये असूनही, गाडीची विक्री अपेक्षेप्रमाणे होत नाहीये. ब्रँडची कमी ओळख हे याचे प्रमुख कारण आहे. अलिकडच्या वर्षांत निसानने भारतात फारसे नवीन मॉडेल्स लाँच केलेले नाहीत, ज्यामुळे ब्रँडची उपस्थिती कमकुवत झाली आहे. यात मर्यादित डीलर नेटवर्कचाही समावेश आहे. देशभरात निसानचे विक्री आणि सेवा नेटवर्क खूपच मर्यादित आहे. जास्त किंमत हे देखील या कारच्या विक्रीतील घसरणीचे एक प्रमुख कारण आहे.

ही आहेत आकर्षक वैशिष्ट्ये

जपानमध्ये तयार होणाऱ्या एक्स-ट्रेलमध्ये जगातील पहिले व्हेरिएबल कम्प्रेशन-टर्बो इंजिन बसवण्यात आले आहे. निसान एक्स-ट्रेलमध्ये डी-स्टेप लॉजिक कंट्रोल आणि पॅडल शिफ्टसह तिसऱ्या पिढीचे एक्सट्रॉनिक सीव्हीटी (XTRONIC CVT) देण्यात आले आहे. ही गाडी डायमंड ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि शॅम्पेन सिल्व्हर या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. निसान एक्स-ट्रेलचे चौथे जनरेशन मॉडेल कंपनीच्या CMF-C प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जे 2021 पासून जागतिक बाजारात विकले जात आहे. परदेशी बाजारात ही एसयूव्ही 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही सीटिंग लेआउटमध्ये येते. तथापि, भारतीय बाजारात फक्त तीन-रो व्हर्जन म्हणजेच 7-सीटर व्हेरिएंट सादर करण्यात आले आहे.

या एसयूव्हीमध्ये ड्युअल-पेन पॅनोरामिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 12.3-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, कीलेस एंट्री आणि पुश-बटण स्टार्ट यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. याशिवाय, ड्रायव्हिंग मोड्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड फंक्शन आणि क्रूझ कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे ही गाडी अधिक चांगली बनते. कंपनी 360-डिग्री कॅमेरा आणि पॅडल शिफ्टर्स देखील देते. तसेच, दुसऱ्या रांगेतील सीट 40/20/40 च्या प्रमाणात फोल्ड केली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, या सीट्स स्लाइडिंग आणि रिक्लाइनिंग फंक्शनसह येतात.

यामुळे ग्राहकांनी केले दुर्लक्ष

मर्यादित मॉडेल लाइनअपमुळे निसान भारतात बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे. मॅग्नाइटसारख्या कार्सनी कंपनीला काही काळ आधार दिला आहे. परंतु एक्स-ट्रेलसारख्या प्रीमियम एसयूव्ही ग्राहकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. जास्त किंमत, मर्यादित डीलर नेटवर्क आणि ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा यांसारख्या कंपन्यांकडून वाढणारी स्पर्धा ही याची कारणे होती. याच कारणांमुळे ग्राहकांनी एक्स-ट्रेलकडे दुर्लक्ष केले.

विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात निसान एक्स-ट्रेल ही एक अतिशय लोकप्रिय एसयूव्ही आहे. परंतु भारतीय ग्राहक परवडणाऱ्या, वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आणि सहज सर्व्हिसिंग करता येणाऱ्या एसयूव्हीला प्राधान्य देतात. यामुळेच निसान एक्स-ट्रेल भारतीय बाजारात टिकू शकली नाही.

हेही वाचा : मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, किया, टेस्ला, स्कोडा, टोयोटा आदी कार कंपन्यांच्या कारची अपडेटेड माहिती जाणून घ्या. ऑटोमोबाईलच्या इतरही बातम्या वाचण्यासाठी आमच्या विशेष पेजला नक्की भेट द्या.येथे क्लिक करा..