MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • New LPG Connection Rules For Consumers: आता LPG ग्राहकांसाठी गॅस कंपनी बदलणं झालं सोपं, जाणून घ्या नवीन नियम

New LPG Connection Rules For Consumers: आता LPG ग्राहकांसाठी गॅस कंपनी बदलणं झालं सोपं, जाणून घ्या नवीन नियम

New LPG Connection Rules For Consumers: पेट्रोलियम, नैसर्गिक वायू नियामक बोर्डाच्या (PNGRB) नवीन नियमांनुसार गॅस ग्राहक आता सहजपणे आपली गॅस कंपनी बदलू शकतील. ही प्रक्रिया मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसारखी सोपी असून यासाठी नवीन कनेक्शन घेण्याची गरज नाही. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 29 2025, 04:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
गॅस ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय!
Image Credit : our own

गॅस ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय!

New LPG Connection Rules For Consumers: गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला गॅस वितरक डीलरच नव्हे, तर संपूर्ण गॅस कंपनीही सहज बदलता येणार आहे. अगदी सिमकार्ड बदलण्याइतकी सोपी प्रक्रिया!

यापूर्वी ग्राहकांना केवळ त्यांच्या डीलरला बदलण्याची मुभा होती. पण आता, जर कोणत्याही गॅस कंपनीची सेवा समाधानकारक वाटली नाही, तर ग्राहक दुसऱ्या कंपनीची सेवा निवडू शकतील तेही नवीन कनेक्शन घेतल्याशिवाय! 

26
नवा नियम नेमका काय आहे?
Image Credit : our own

नवा नियम नेमका काय आहे?

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक बोर्ड (PNGRB) नवीन एलपीजी वितरण नियम लागू करत आहे. यानुसार

ग्राहक गॅस डीलरबरोबरच आता संपूर्ण गॅस कंपनी बदलू शकतील

ही प्रक्रिया मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसारखीच सोपी असणार आहे

नवीन कनेक्शन घेण्याची गरज नाही, फक्त वितरक कंपनी बदलली जाईल

ऑनलाइन किंवा अधिकृत अ‍ॅपद्वारे ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे

Related Articles

Related image1
India Post Update: पोस्ट खात्यात मोठे बदल, 1 ऑक्टोबरपासून 'स्पीड पोस्ट'चे दर आणि डिलिव्हरीचे नियम बदलणार; तुमच्या बजेटवर थेट परिणाम!
Related image2
Sweet Potato : रताळी उकडून खावीत, की वाफवून? मधुमेहाच्या रुग्णांनी ती खावीत का? लहान मुलांना फायदेशीर आहेत का?
36
ग्राहकांसाठी याचा काय फायदा होणार?
Image Credit : our own

ग्राहकांसाठी याचा काय फायदा होणार?

सेवा अधिक दर्जेदार आणि वेळेवर मिळेल

डीलरची मनमानी संपुष्टात येईल

गॅस पुरवठा अधिक विश्वासार्ह होईल

ग्रामीण भागात गॅस मिळवणं होईल अधिक सोपं 

46
'पीएम उज्ज्वला योजना'चा मोठा फायदा
Image Credit : google

'पीएम उज्ज्वला योजना'चा मोठा फायदा

2014 नंतर सुरू झालेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे देशभरात गॅस कनेक्शनचे प्रमाण वाढले आहे.

या योजनेतून महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळते

दर वेळेस गॅस रिफिलसाठी ₹300 पर्यंतचे अनुदान दिले जाते

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 25 लाख नवीन महिलांना फायदा मिळणार आहे

या योजनांमुळे ग्रामीण भागात चुलींचा वापर घटतोय, आरोग्य सुधारतोय

56
ग्राहकांसाठी का आहे ही सुविधा महत्त्वाची?
Image Credit : Asianet News

ग्राहकांसाठी का आहे ही सुविधा महत्त्वाची?

काही वेळा डीलर गॅस वेळेवर पोहोचवत नाहीत, तर काही ठिकाणी गॅसचा तुटवडा असतो. अशा वेळी दुसऱ्या कंपनीचा पर्याय निवडणे हा ग्राहकाचा हक्क असावा. आता नवीन नियमानुसार, गॅस मिळवण्यासाठी ग्राहक इतर कंपनीकडे वळू शकतील. जे अधिक सुविधा आणि विश्वासार्हता देऊ शकतील. 

66
गॅस ग्राहकांना आता निवडीचा अधिकार!
Image Credit : Facebook

गॅस ग्राहकांना आता निवडीचा अधिकार!

या नव्या बदलामुळे गॅस सेवा क्षेत्रात स्पर्धा वाढेल, कंपन्यांना ग्राहक समाधानी ठेवण्यासाठी सेवा दर्जा सुधारावा लागेल आणि ग्राहकांना चांगली सेवा, वेळेत डिलिव्हरी आणि सुलभ गॅस रिफिल मिळेल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
आम्ही गावकरी नाही, सैनिक आहोत! गावकऱ्यांना लष्कराचे शस्त्र प्रशिक्षण
Recommended image2
जानेवारी 2026 चार ग्रहांचा संयोग: कोणाला जॅकपॉट? प्रेमजीवन कसे? जाणून घ्या
Recommended image3
टॅक्सी ड्रायव्हर्ससाठी आनंदाची बातमी, Hyundi ने लाँच केल्या 2 नव्या कार
Recommended image4
एका किलोमीटरसाठी फक्त 47 पैसे खर्च.. ह्युंदाई प्राइम टॅक्सी कार लाँच
Recommended image5
वास्तू गाईड : सकारात्मक ऊर्जेने भरलेले घर बांधतांना या चुका कधीही करू नका!
Related Stories
Recommended image1
India Post Update: पोस्ट खात्यात मोठे बदल, 1 ऑक्टोबरपासून 'स्पीड पोस्ट'चे दर आणि डिलिव्हरीचे नियम बदलणार; तुमच्या बजेटवर थेट परिणाम!
Recommended image2
Sweet Potato : रताळी उकडून खावीत, की वाफवून? मधुमेहाच्या रुग्णांनी ती खावीत का? लहान मुलांना फायदेशीर आहेत का?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved