ATM Charges : 1 जुलैपासून ATM चे नवीन नियम होणार लागू, दर-वारंवारीतेत झाले आहेत बदल
डिजिटल व्यवहार वाढत असतानाही ATM वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ATM मधून पैसे काढण्यावरही नागरिकांचा भर असल्याचे यावरुन दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, बँकांनी ATM शुल्काबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. १ जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहेत.

जुलै १ पासून बँक सेवांवर नवीन शुल्क
१ जुलैपासून ICICI, HDFC सारख्या प्रमुख खाजगी बँका त्यांच्या सेवांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कात बदल करणार आहेत. ATM व्यवहार, डेबिट कार्ड, IMPS, रोख रक्कम जमा करणे यासारख्या सेवांसाठी नवीन दर लागू होतील. त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.
आईसीआईसीआई बँकेचे ATM
महानगरांमध्ये दरमहा ३ ATM व्यवहार मोफत मिळतील. उर्वरित व्यवहारांसाठी ₹२३ + कर आकारला जाईल. छोट्या शहरांमध्ये ५ ATM व्यवहार मोफत मिळतील. तर जमा शिल्लक तपासणीसाठी ₹८.५० + कर आकारले जाईल.
IMPS, रोख रक्कम काढण्याचे नवीन दर
IMPS शुल्क ₹१००० पर्यंत ₹२.५०, ₹१००० ते १ लाख ₹५, १ लाख ते ५ लाख ₹१५ अशी आकरले जाईल. दरमहा ३ वेळा मोफत रोख रक्कम काढता येईल. त्यानंतर ₹१५० शुल्क आकारले जाईल.
डेबिट कार्ड, जमा सेवांवर नवीन शुल्क
डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क ₹३००, ग्रामीण खातेदारांसाठी ₹१५०. नवीन कार्डसाठी ₹३०० शुल्क लावले जाईल. रोख/धनादेश जमा, डिमांड ड्राफ्टसाठी ₹१००० ला ₹२, किमान ₹५० शुल्क लावले जाईल.
HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर मर्यादा
ड्रीम११, MPL वर ₹१०,००० पेक्षा जास्त खर्च केल्यास १% शुल्क आकारले जाईल. Paytm, Mobikwik मध्ये ₹१०,००० पेक्षा जास्त जमा केल्यास १% शुल्क राहिल.

