पोटाच्या तक्रारी, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता असेल तर यामागे अनेकदा आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन बिघडलेले असू शकते. हे संतुलन सुधारण्यासाठी रोजच्या आहारात योग्य पेयांचा समावेश करा.
पोटाच्या तक्रारी, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता असेल तर यामागे अनेकदा आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन बिघडलेले असू शकते. हे संतुलन सुधारण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहू नका. रोजच्या आहारात योग्य पेयांचा समावेश करा. आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही पेयांविषयी जाणून घेऊया.
1. आल्याचा चहा
आहारात आल्याच्या चहाचा समावेश केल्यास पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
2. ग्रीन टी
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेला ग्रीन टी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य जपण्यास मदत होते.
3. ताक
ताक पिणे देखील आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
4. नारळ पाणी
नारळ पाणी पिणे पचन आणि आतड्यांसाठी चांगले असते.
5. पपईचा रस
पपईमध्ये असलेले 'पपेन' नावाचे एन्झाइम पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. त्यामुळे पपईचा रस पिण्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
6. बीटचा रस
फायबरने भरपूर असलेला बीटचा रस प्यायल्याने आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होते आणि आतड्यांचे आरोग्य जपण्यास मदत होते.
7. ॲपल सायडर व्हिनेगर
ॲपल सायडर व्हिनेगर देखील एक चांगला प्रोबायोटिक पदार्थ आहे. हे पचन सुधारण्यास मदत करते.
टीप: आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञ किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घ्या.


