- Home
- Utility News
- मुंबईकरांनो लक्ष द्या! आता खिशातले पैसे वाचणार; लोकलच्या तिकिटावर सवलत देणारं 'हे' खास App आलं, पाहा कसं वापरायचं?
मुंबईकरांनो लक्ष द्या! आता खिशातले पैसे वाचणार; लोकलच्या तिकिटावर सवलत देणारं 'हे' खास App आलं, पाहा कसं वापरायचं?
RailOne App Ticket Booking : मुंबई लोकल प्रवाशांसाठी रेल्वेने RailOne मोबाईल अॅपवर एक खास ऑफर आणली आहे. या अॅपमधील R-Wallet वापरून अनारक्षित तिकीट बुक केल्यास प्रवाशांना ३% सूट आणि कॅशबॅक मिळणार आहे.

लोकल तिकीट-पाससाठी रेल्वेची खास ऑफर!
मुंबई : दररोज मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक दिलासादायक आणि फायदेशीर सुविधा सुरू केली आहे. तिकीट आणि पास काढणे अधिक सोपे, जलद आणि पूर्णपणे कॅशलेस व्हावे, यासाठी रेल्वेकडून RailOne मोबाईल अॅपला प्रोत्साहन दिले जात आहे. विशेष म्हणजे, या अॅपवरून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी पुढील सहा महिन्यांसाठी खास सवलत योजना लागू करण्यात आली आहे.
RailOne App वर तिकीट काढल्यास मिळणार सूट
RailOne अॅपद्वारे अनारक्षित लोकल तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना 3 टक्के सूट व कॅशबॅक देण्यात येणार आहे. ही ऑफर 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीसाठी लागू राहणार आहे.
मात्र, ही सवलत मिळवण्यासाठी काही अटी आहेत.
तिकीट बुकिंग करताना RailOne App मधील R-Wallet चाच वापर करावा लागेल
कोणतेही बाह्य UPI किंवा ऑनलाइन पेमेंट अॅप वापरल्यास सवलत मिळणार नाही
ही ऑफर फक्त अनारक्षित तिकिटांसाठीच लागू असेल
UTS वरून RailOne कडे स्थलांतर का?
सध्या UTS अॅपमधून लोकलचा पास काढता येत नसल्याने, प्रवाशांनी RailOne App वर स्विच करावे, असे रेल्वेकडून आवाहन करण्यात आले आहे. RailOne हे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सेवा देणारे अॅप असल्याने तिकीट आणि पास काढताना कोणतीही अडचण येणार नाही. UTS युजर्सना RailOne मध्ये स्थलांतर करताना, अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार सोप्या स्टेप्समध्ये जुने क्रेडेन्शियल्स वापरता येणार आहेत.
RailOne App : सर्व रेल्वे सेवा एका अॅपमध्ये
RailOne App हे प्रवाशांसाठी एक ऑल-इन-वन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या अॅपवरून खालील सुविधा मिळतात.
आरक्षित व अनारक्षित तिकीट बुकिंग
प्लॅटफॉर्म तिकीट
रिअल-टाइम ट्रेन अपडेट्स
कोच पोझिशन माहिती
PNR स्टेटस
फूड ऑर्डरिंग
रिफंड ट्रॅकिंग
Rail Madad तक्रार निवारण
हे अॅप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
प्रवाशांसाठी विशेष सोय
RailOne App चा वापर वाढवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर QR Code लावण्यात आले आहेत. तसेच 139 हेल्पलाईन वर RailOne संदर्भातील शंकांचे निरसन करण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना RailOne App चा अधिकाधिक वापर करण्याचे, कॅशबॅक व सवलतींचा लाभ घेण्य्ह्याचे आवाहन केले आहे.

