MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Local : चर्चगेट–विरार लोकल प्रवासाला मिळणार सुरक्षेचं कवच; ब्रेक निकामी झाले तरी ट्रेन आपोआप थांबणार

Mumbai Local : चर्चगेट–विरार लोकल प्रवासाला मिळणार सुरक्षेचं कवच; ब्रेक निकामी झाले तरी ट्रेन आपोआप थांबणार

Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार या वर्दळीच्या मार्गावर 'कवच' ही आधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. ही स्वयंचलित प्रणाली अपघात टाळण्यासाठी आपोआप ब्रेक लावते. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Jan 07 2026, 03:32 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
चर्चगेट–विरार लोकल प्रवासाला मिळणार सुरक्षेचं कवच
Image Credit : Social media

चर्चगेट–विरार लोकल प्रवासाला मिळणार सुरक्षेचं कवच

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेली लोकल ट्रेन आता अधिक सुरक्षित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर ‘कवच’ ही आधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचे काम जोरात सुरू असून या प्रकल्पातील सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर लोकल प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि अपघातमुक्त होणार आहे.

विरार ते चर्चगेट या सुमारे 60 किलोमीटर लांबीच्या मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. वाढती गर्दी, लोकलची सुस्साट गती आणि तांत्रिक चुकांची शक्यता लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘कवच’ प्रणाली नेमकी काय आहे आणि ती लोकल प्रवासात कशी मदत करणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
काय आहे ‘कवच’ सुरक्षा प्रणाली?
Image Credit : X(Twitter)

काय आहे ‘कवच’ सुरक्षा प्रणाली?

कवच ही एक स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने रेल्वेगाडीचा वेग, सिग्नलची स्थिती तसेच समोर धावणाऱ्या गाड्यांमधील अंतर यावर सतत नियंत्रण ठेवले जाते. चालकाकडून सिग्नल चुकून दुर्लक्षित झाला, वेग मर्यादेपेक्षा जास्त झाला किंवा अचानक धोका निर्माण झाला, तरी कवच प्रणाली आपोआप ब्रेक लावते. त्यामुळे समोरासमोर धडक होणे, सिग्नल तोडणे यांसारख्या गंभीर दुर्घटना टाळणे शक्य होणार आहे. 

Related Articles

Related image1
Western Railway Update : मुंबईकरांनो, आता गावची वारी होणार खास! नव्या वर्षात पश्चिम रेल्वे देणार 'हे' मोठं सरप्राईज
Related image2
जानेवारी 2026 मध्ये 2 लॉन्ग विकेंड, जोडून 7 दिवसांच्या सुट्या, संक्रांती-प्रजासत्ताक दिनाला चंगळ!
35
प्रकल्पाची सध्याची स्थिती
Image Credit : fb

प्रकल्पाची सध्याची स्थिती

या प्रकल्पांतर्गत 60 किलोमीटर मार्गावर टॉवर उभारणीसाठी आवश्यक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत टॉवर उभारणीचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले असून 15 पैकी 14 ठिकाणी माती परीक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी 12 ठिकाणी पायाभरणीचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित बांधकामेही प्रगतीपथावर आहेत. 

45
पुढील टप्प्यात काय होणार?
Image Credit : our own

पुढील टप्प्यात काय होणार?

या संपूर्ण योजनेत 17 स्थानकांवर टीसीएएस (Train Collision Avoidance System) बसवण्यात येणार आहे. यापैकी सहा स्थानकांवरील काम पूर्ण झाले आहे. तसेच लिडार सर्वेक्षण, आरएफआयडी टॅग बसवणे आणि ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे कामही सुरू आहे. प्रत्यक्ष परिस्थितीत प्रणालीची चाचणी घेतली जात असून आतापर्यंत 24 किलोमीटर मार्गावर इंजिन चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. 

55
मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित होणार
Image Credit : SOCIAL MEDIA

मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित होणार

कवच प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित, नियंत्रित आणि आधुनिक होणार असून लाखो प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Mumbai Bomb Threat : अमिताभ बच्चन यांचा बंगला, विमानतळ आणि महापौरांच्या कार्यालयाला बॉम्बची धमकी
Recommended image2
KEM Hospital : केईएम रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार, प्लास्टर असलेला रुग्ण जिने चढतानाचा व्हिडिओ व्हायरल
Recommended image3
Mumbai Cook Salary : महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त कमवतो हा स्वयंपाकी, आता करणार थायलंडची ट्रिप
Recommended image4
Mother Dairy : 12 नोव्हेंबरपासून मदर डेअरीचे दूध महाग; प्रति लिटरमागे 2 ते 4 रुपयांची वाढ
Recommended image5
Mercedes SUV Damage : मुंबईत उंदरांनी कुरतडली 1 कोटींची मर्सिडीज, गाडीशिवाय डॉक्टर दाम्पत्य भरतंय २.५ लाखांचा EMI
Related Stories
Recommended image1
Western Railway Update : मुंबईकरांनो, आता गावची वारी होणार खास! नव्या वर्षात पश्चिम रेल्वे देणार 'हे' मोठं सरप्राईज
Recommended image2
जानेवारी 2026 मध्ये 2 लॉन्ग विकेंड, जोडून 7 दिवसांच्या सुट्या, संक्रांती-प्रजासत्ताक दिनाला चंगळ!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved