- Home
- Utility News
- सर्वात स्वस्त 5-स्टार सेफ्टी कार, 6.26 लाखांपासून सुरवात, तुमच्यासह कुटुंब राहील सुरक्षित!
सर्वात स्वस्त 5-स्टार सेफ्टी कार, 6.26 लाखांपासून सुरवात, तुमच्यासह कुटुंब राहील सुरक्षित!
Most Affordable 5 Star Safety Rated Cars : भारतीय कार बाजारात सुरक्षेला महत्त्व वाढत आहे आणि भारत NCAP (BNCAP) ने याला आणखी गती दिली आहे. 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलेल्या सर्वोत्तम कार्सबद्दल जाणून घेऊया.

कार खरेदीची पद्धत बदलली
भारतीय कार खरेदीदार आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. पूर्वी कार खरेदी करताना लोक मायलेज आणि लूक पाहत असत. आता सेफ्टी फिचर्सही महत्त्वाचे झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेले रस्ते अपघात त्याला कारणीभूत आहेत.
नवीन पिढीचा सुरक्षेला प्राधान्यक्रम
आजची नवीन पिढी सुरक्षेला प्राधान्य देत आहे. या बदललेल्या विचारसरणीमुळे कार कंपन्यांना प्रत्येक नवीन कारमध्ये जास्तीत जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यास भाग पाडले आहे. आधी महागड्या कारमध्ये न येणारे सुरक्षा फिचर्स आता साध्या कारमध्ये दिसून येत आहे.
भारत एनसीएपी (BNCAP)
सरकारने कठोर क्रॅश टेस्टद्वारे कारला रेटिंग देणारी भारत NCAP (BNCAP) सुरू करून हा ट्रेंड पुढे नेला आहे. त्यामुळे प्रत्येक कारची बिल्ट कॉलिटी सर्वांसमोर येत आहे. त्यावरुन ग्राहक खरेदीचा निर्णय घेत आहेत.
5-स्टार सेफ्टी स्कोअर
हे रेटिंग सादर केल्यानंतर, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या अनेक कार्सनी 5-स्टार सेफ्टी स्कोअर मिळवला आहे. अशा 5 कार्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. या कारमध्ये तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहू शकता.
मारुती सुझुकी डिझायर
मारुती सुझुकी डिझायरने सुरक्षा आणि मायलेजमध्ये मोठी झेप घेतली आहे. नवीन पिढीच्या डिझायरने भारत NCAP मध्ये पूर्ण 5-स्टार रेटिंग मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. 6.26 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेल्या डिझायरने प्रौढांच्या सुरक्षेसाठी 29.46/32 आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 41.57/49 गुण मिळवले. सुरक्षेसाठी कारमध्ये सहा एअरबॅग्ज, ABS-EBD, आयसोफिक्स, सर्व सीटसाठी रिमाइंडर आणि हिल-होल्ड असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
टाटा अल्ट्रॉझ
टाटा अल्ट्रॉझला भारत NCAP मध्ये पूर्ण 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. अल्ट्रॉझने प्रौढांच्या सुरक्षेसाठी 29.65/32 आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 44.90/49 गुण मिळवले. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.30 लाख रुपये आहे. सुरक्षेसाठी, कारमध्ये सहा एअरबॅग्ज, ESC आणि सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट आहेत.
महिंद्रा XUV 3XO
महिंद्राची सर्वात स्वस्त SUV, XUV 3XO ने सिद्ध केले आहे की बजेटमध्येही उच्च स्तरीय सुरक्षा शक्य आहे. याची किंमत 10 लाखांपेक्षा कमी आहे. या कारने 5-स्टार भारत NCAP रेटिंग मिळवले आहे. प्रौढांच्या सुरक्षेसाठी 29.36/32 आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 43.00/49 गुण मिळवले. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सहा एअरबॅग्ज, ESC, हिल-स्टार्ट असिस्ट आणि हाय व्हेरिएंटमध्ये 360-डिग्री कॅमेरा यांचा समावेश आहे.
होंडा अमेझ
सुरक्षेच्या बाबतीत होंडा अमेझ आता तिच्या सेगमेंटमधील आघाडीच्या कारपैकी एक बनली आहे. डिझायरशी थेट स्पर्धेत असलेल्या या कारने भारत NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळवले आहे. प्रौढांच्या सुरक्षेसाठी 28.33/32 आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 40.81/49 गुण मिळवले. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सहा एअरबॅग्ज, ESC, आयसोफिक्स आणि सर्व सीटसाठी रिमाइंडर यांचा समावेश आहे.
स्कोडा कायलाक
युरोपियन ब्रँड स्कोडा आपल्या उत्कृष्ट बिल्ड क्वालिटीसाठी ओळखला जातो. स्कोडाच्या कायलाकने भारत NCAP चाचणीत 5-स्टार रेटिंग मिळवले आहे. ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, जिने प्रौढांच्या सुरक्षेसाठी 30.88/32 आणि मुलांच्या सुरक्षेसाठी 45/49 गुण मिळवले. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सहा एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल-होल्ड आणि TPMS यांचा समावेश आहे.

