MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Bank Account : तुमच्या नकळत बँक खात्यातून पैसे कट झालेत? मग हे एक काम लगेच करा

Bank Account : तुमच्या नकळत बँक खात्यातून पैसे कट झालेत? मग हे एक काम लगेच करा

Bank Account: तुम्ही कोणताही व्यवहार न करता तुमच्या बँक खात्यातून पैसे कट झालेत का? अशा वेळी बँकेची चूक, ग्राहकाची जबाबदारी आणि तक्रार करण्याची वेळ याबद्दलचे नियम माहिती असणं खूप गरजेचं आहे.

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 22 2026, 12:40 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बँक फ्रॉड आणि रिफंड
Image Credit : Asianet News

बँक फ्रॉड आणि रिफंड

आजकाल ऑनलाइन पेमेंटचं प्रमाण वाढलंय, पण त्यासोबतच बँक खात्यातून नकळत पैसे कट होण्याच्या घटनाही वाढल्यात. भामटे फेक एसएमएस, फ्रॉड लिंक्स, फोन कॉल्स आणि धोकादायक अ‍ॅप्सच्या माध्यमातून बँक डिटेल्स चोरतात. अनेकदा तुम्ही कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे उडतात. असं झाल्यास तुम्ही लगेच बँकेशी संपर्क साधून तक्रार नोंदवली पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार, जर बँकेच्या चुकीमुळे पैसे कट झाले असतील, तर ग्राहकाला कोणताही भुर्दंड बसत नाही. बँकेची किंवा तुमची चूक नसतानाही थर्ड-पार्टी सिक्युरिटीमुळे फ्रॉड झाला असेल, तरीही वेळेत तक्रार करणं महत्त्वाचं आहे. अर्थात, प्रत्येक फ्रॉडमध्ये पूर्ण पैसे परत मिळतीलच याची शाश्वती नसते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पैसे कट झाल्यावर सर्वात आधी काय करावं?
Image Credit : our own

पैसे कट झाल्यावर सर्वात आधी काय करावं?

तुमच्या खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्याचं समजताच, लगेच बँकेच्या अधिकृत कस्टमर केअर नंबरवर किंवा अ‍ॅपवर तक्रार करा. गरज पडल्यास बँक खाते, कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग तात्पुरतं ब्लॉक करायला सांगा. व्यवहाराची तारीख, रक्कम, ट्रान्झॅक्शन आयडी, बँकेचा मेसेज आणि तक्रार क्रमांक नक्की सेव्ह करून ठेवा. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तुम्ही भारत सरकारच्या '1930' या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर लगेच कॉल करू शकता. याशिवाय, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर जाऊनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्याचा नंबर (Acknowledgement Number) जपून ठेवा, कारण तो नंतर चौकशीसाठी आणि पैसे परत मिळवण्यासाठी उपयोगी पडतो. बँकेत आणि सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करायला अजिबात उशीर करू नका.

Related Articles

Related image1
Bank Account Closure : बँक खातं बंद करायचंय? 'मायनस बॅलन्स' असेल तर पैसे भरावे लागतील का?
Related image2
Gold Loan : सोन्याच्या बिस्किटांवर बँक कर्ज का देत नाही? हे आहे खरं कारण
35
रिझर्व्ह बँकेचे (RBI) नियम काय सांगतात?
Image Credit : our own

रिझर्व्ह बँकेचे (RBI) नियम काय सांगतात?

बँकेच्या चुकीमुळे किंवा त्रुटीमुळे तुमच्या खात्यातून पैसे कट झाले असतील, तर तुमची जबाबदारी शून्य (Zero Liability) असते. तुमची किंवा बँकेची चूक नसताना थर्ड-पार्टीमुळे पैसे गेले असतील, आणि तुम्ही बँकेचा मेसेज आल्यापासून ३ कामकाजाच्या दिवसांत (Working Days) तक्रार केली, तर नियमांनुसार तुम्हाला झिरो लायबिलिटीचा फायदा मिळतो. जर तुम्ही ४ ते ७ दिवसांत तक्रार केली, तर खात्याचा प्रकार आणि नियमांनुसार तुमची जबाबदारी ठरवली जाते. ७ दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास बँकेचे स्वतःचे नियम लागू होतात. पण, जर तुम्ही तुमचा पासवर्ड, ओटीपी (OTP) किंवा पिन कोणासोबत शेअर केला असेल आणि त्यामुळे फ्रॉड झाला असेल, तर बँकेला तक्रार करेपर्यंत झालेल्या नुकसानीची जबाबदारी तुमचीच असते. त्यामुळे फ्रॉड कसा झाला आणि तुम्ही किती वेळात तक्रार केली, या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.

45
गेलेले पैसे किती दिवसांत परत मिळतात?
Image Credit : our own

गेलेले पैसे किती दिवसांत परत मिळतात?

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, झिरो लायबिलिटी किंवा लिमिटेड लायबिलिटी असलेल्या प्रकरणांमध्ये, ग्राहकाने तक्रार केल्यापासून १० कामकाजाच्या दिवसांत बँकेने ती रक्कम तात्पुरती खात्यात जमा करणं बंधनकारक आहे. पण हा अंतिम निर्णय नसतो किंवा प्रत्येक फ्रॉडमध्ये पैसे मिळतीलच असं नाही. बँक या प्रकरणाची चौकशी चालू ठेवते आणि चौकशीच्या निकालानुसार ग्राहकाची अंतिम जबाबदारी ठरवली जाते. तक्रार करण्यासाठी ७ दिवस वाट पाहावी लागते, हा एक गैरसमज आहे. फ्रॉड झाल्याचं समजताच शक्य तितक्या लवकर तक्रार करणं केव्हाही चांगलं. तुमच्या तक्रारीची कॉपी, बँकेचं उत्तर, व्यवहाराचे तपशील आणि सायबर क्राईम तक्रार क्रमांक जपून ठेवा. जर बँकेने तुमच्या तक्रारीचं निवारण केलं नाही, तर तुम्ही बँकेच्या प्रक्रियेनंतर रिझर्व्ह बँकेच्या लोकपालाकडे (RBI Ombudsman) दाद मागू शकता.

55
सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय करावं?
Image Credit : our own

सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय करावं?

बँकेच्या नावाने आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. तुमचा ओटीपी (OTP), यूपीआय पिन (UPI PIN), कार्ड डिटेल्स आणि इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका. स्वतःला बँक अधिकारी सांगून कॉल करणाऱ्यांना तुमची गोपनीय माहिती अजिबात देऊ नका. पैसे कट झाल्याचा मेसेज आल्यास, तो व्यवहार खरा आहे की नाही हे बँकेच्या अधिकृत अ‍ॅप किंवा वेबसाईटवर तपासून पाहा. फ्रॉड झाल्याची खात्री होताच लगेच बँकेला आणि '1930' या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा. तक्रार करायला उशीर केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता कमी होते. रिझर्व्ह बँकेचे नियम ग्राहकांना संरक्षण देत असले, तरी पूर्ण पैसे परत मिळणं हे फ्रॉडचं स्वरूप आणि चौकशीच्या निकालावर अवलंबून असतं. त्यामुळे पैसे कट झाल्यावर लगेच अ‍ॅक्शन घेणं, पुरावे जपणं आणि अधिकृत ठिकाणी तक्रार करणं सर्वात महत्त्वाचं आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(54.0 ov) 99 & 156/4
Day 4
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
Live
NZNZ
(3.4 ov)41/0
INDIND
-
IND chose to bowl.
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
5th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sun, 1 Nov, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Flooded Car Starting Risk : पावसात भिजलेली कार किंवा बाईक स्टार्ट करताय? लाखोंचा फटका बसेल, ही चूक करू नका
Recommended image2
Gold Silver Prices Today : 22 ऑक्टोबरचे सोन्या-चांदीचे नवे दर, मुंबईसह प्रमुख शहरांतील रेट्स तपासा
Recommended image3
Petrol Diesel Prices : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत? प्रमुख शहरांतील रेट्स तपासा
Recommended image4
Home Loan Top Up Eligibility: होम लोन टॉप-अपसाठी तुम्ही पात्र आहात का? या ५ सोप्या स्टेप्समध्ये तपासा
Recommended image5
Flipkart Food Delivery : झोमॅटो, स्विगीला टक्कर...फ्लिपकार्टची फूड डिलिव्हरीमध्ये एन्ट्री, 8000 कर्मचाऱ्यांवर टेस्टिंग सुरू
Related Stories
Recommended image1
Bank Account Closure : बँक खातं बंद करायचंय? 'मायनस बॅलन्स' असेल तर पैसे भरावे लागतील का?
Recommended image2
Gold Loan : सोन्याच्या बिस्किटांवर बँक कर्ज का देत नाही? हे आहे खरं कारण
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved