MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Bank Account Closure : बँक खातं बंद करायचंय? 'मायनस बॅलन्स' असेल तर पैसे भरावे लागतील का?

Bank Account Closure : बँक खातं बंद करायचंय? 'मायनस बॅलन्स' असेल तर पैसे भरावे लागतील का?

बँक खातं वापरत नसाल तर ते बंद करण्याचा विचार अनेकजण करतात. पण खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्याने दंड लागून बॅलन्स 'मायनस'मध्ये गेला असेल, तर काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 06 2026, 03:35 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
खात्यात मायनस बॅलन्स असेल तर काय करावं?
Image Credit : our own

खात्यात मायनस बॅलन्स असेल तर काय करावं?

बँक खातं बंद करण्याची अनेक कारणं असू शकतात. मिनिमम बॅलन्स ठेवणं शक्य नसतं, शिवाय डेबिट कार्डची वार्षिक फी आणि एसएमएस चार्जेस यामुळे लोक खातं बंद करतात. न वापरलेल्या खात्यावर सतत चार्जेस लागत असल्याने ग्राहकांना काळजी वाटते. त्यामुळे खातं बंद करण्यापूर्वी त्यात काही थकबाकी, ऑटो-डेबिट किंवा क्लिअर न झालेले चेक आहेत का, हे नक्की तपासा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
खातं बंद करताना मायनस रक्कम भरणं गरजेचं आहे का?
Image Credit : our own

खातं बंद करताना मायनस रक्कम भरणं गरजेचं आहे का?

खातं बंद करण्याची पद्धत प्रत्येक बँकेनुसार वेगळी असते. काही बँका ऑनलाइन किंवा ॲपद्वारे खातं बंद करण्याची सुविधा देतात, तर काही बँका ग्राहकांना शाखेत बोलावतात. त्यामुळे तुमच्या बँकेची पद्धत आधी समजून घ्या. यासाठी तुम्हाला क्लोजर फॉर्म, ओळखपत्र आणि उरलेले पैसे ट्रान्सफर करण्यासाठी दुसऱ्या खात्याची माहिती द्यावी लागते. बँकेच्या नियमानुसार डेबिट कार्ड आणि न वापरलेलं चेकबुकही जमा करावं लागतं.

Related Articles

Related image1
SBI Debit Card : तुमच्याकडे एसबीआयचं डेबिट कार्ड आहे का? न वापरताही कट होतात पैसे
35
मिनिमम बॅलन्स नसल्यास खातं मायनस होतं का?
Image Credit : our own

मिनिमम बॅलन्स नसल्यास खातं मायनस होतं का?

मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने खातं मायनसमध्ये गेलं तर काय करायचं, हा सर्वात मोठा प्रश्न असतो. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, केवळ मिनिमम बॅलन्स न ठेवल्याबद्दल लावलेल्या दंडामुळे बचत खात्याचा बॅलन्स मायनसमध्ये जाऊ शकत नाही. जर तुमच्या खात्यात मायनस बॅलन्स दिसत असेल, तर तो नेमका कशामुळे झालाय, याची बँकेकडे लेखी माहिती मागा.

45
बँक खातं बंद करण्याचे महत्त्वाचे नियम
Image Credit : our own

बँक खातं बंद करण्याचे महत्त्वाचे नियम

खात्यात मायनस रक्कम का दिसतेय, याचं कारण फक्त मिनिमम बॅलन्सचा दंड आहे की इतर कोणते ट्रान्झॅक्शन किंवा सर्व्हिस चार्जेस आहेत, हे स्पष्ट करून घ्या. बँकांनी मिनिमम बॅलन्सचे नियम आणि त्याचे चार्जेस ग्राहकांना पारदर्शकपणे सांगायला हवेत, असं आरबीआयचे नियम सांगतात. त्यामुळे खातं बंद करण्यापूर्वी चार्जेस तपासा आणि चुकीचा दंड लागला असेल तर बँकेत तक्रार करा.

55
मायनस बॅलन्सबाबत आरबीआयचे नियम काय सांगतात?
Image Credit : our own

मायनस बॅलन्सबाबत आरबीआयचे नियम काय सांगतात?

'खातं मायनसमध्ये आहे, त्यामुळे ते बंद करण्यासाठी पूर्ण पैसे भरावेच लागतील' असा घाईघाईने निर्णय घेऊ नका. आधी मायनस रक्कम कशामुळे झालीय ते शोधा. जर हा फक्त मिनिमम बॅलन्सचा दंड असेल, तर तुम्ही आरबीआयच्या नियमांचा संदर्भ देऊन बँकेला जाब विचारू शकता. प्रश्न सुटला नाही, तर बँकेच्या तक्रार निवारण कक्षाकडे आणि नंतर आरबीआयकडे दाद मागा.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Indian Railway Child Ticket Rules : ट्रेनमध्ये लहान मुलांसाठी 50% तिकीट... वयाची अट माहितीये का?
Recommended image2
iPhone 17 की iPhone 16 कोणता फोन घेणं फायद्याचं ठरेल? वाचा सर्वकाही डिटेल्स
Recommended image3
Jio 450 Plan : जिओचा नवा ३६ दिवसांचा प्लॅन, या स्पेशल रिचार्जमध्ये मिळणार धमाकेदार ऑफर्स
Recommended image4
ATM Refund Rules : एटीएममधून पैसे आले नाहीत? रोज मिळतील १०० रुपये, जाणून घ्या नियम
Recommended image5
BigFlix: भारतात २००८ मध्येच सुरू झाला होता OTT प्लॅटफॉर्म! तुम्हाला माहितीये का ही गोष्ट?
Related Stories
Recommended image1
SBI Debit Card : तुमच्याकडे एसबीआयचं डेबिट कार्ड आहे का? न वापरताही कट होतात पैसे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved