MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Mobile Market: Vivo X300 FE बाजारात घालणार धुमाकूळ, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा

Mobile Market: Vivo X300 FE बाजारात घालणार धुमाकूळ, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा

Mobile Market: विवो लवकरच आपल्या X-सीरिजमध्ये एक नवीन प्रीमियम स्मार्टफोन, Vivo X300 FE, लाँच करणार आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर, 6500mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि 50MP मुख्य कॅमेरा अशा जबरदस्त फीचर्ससह येणार असल्याची चर्चा आहे.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Mar 08 2026, 08:18 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
Vivo X300 FE
Image Credit : Google

Vivo X300 FE

भारतीय स्मार्टफोन बाजारात लवकरच एका नवीन प्रीमियम मॉडेलची एन्ट्री होणार आहे. चीनची टेक कंपनी विवो आपल्या X-सीरिजमध्ये Vivo X300 FE हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन बाजारात आधीपासून असलेल्या X300 आणि X300 Pro मॉडेल्सच्या पंक्तीत बसेल. कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, गीकबेंच लिस्टिंगवर दिसल्याने याच्या लाँचच्या चर्चांना उधाण आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, Vivo X300 FE मध्ये 6.31-इंचाचा LPTO AMOLED डिस्प्ले असू शकतो.
24
Vivo X300 FE specifications
Image Credit : Google

Vivo X300 FE specifications

या फोनचा डिस्प्ले 120Hz अ‍ॅडाप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच, 5,000 निट्सपर्यंत ब्राईटनेस असल्यामुळे भर उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसेल. याला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाल्याने हा फोन पाणी आणि धूळ यांपासून सुरक्षित राहील. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर वापरला जाऊ शकतो. 12GB रॅममुळे मल्टी-टास्किंग आणि गेमिंगचा अनुभव एकदम स्मूथ असेल. फोनमध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल, ज्यामुळे फोन काही मिनिटांतच फुल चार्ज होईल.

Related Articles

Related image1
नवीन फोन घेणार आहात? थोडं थांबा.. Vivo चा तब्बल 7000mAh बॅटरीवाला फोन येतोय!
Related image2
New Mobile: कॅमेरा प्रेमींसाठी Vivo V70 सीरीज भारतात लाँच, जाणून घ्या अधिक
34
Vivo X300 FE camera specs
Image Credit : Google

Vivo X300 FE camera specs

कॅमेरा हे या स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण असेल. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स (3x ऑप्टिकल झूमसह) आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा यांचा समावेश असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
44
Vivo X300 FE price in India
Image Credit : Google

Vivo X300 FE price in India

हा फोन कूल लिलाक, ग्रॅफाइट ब्लॅक आणि मूनलाइट व्हाइट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होईल. भारतात हा फोन मे 2026 च्या पहिल्या पंधरवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या फोनची सुरुवातीची किंमत 64,999 रुपये असू शकते. अधिकृत घोषणा बाकी असली तरी, इतक्या दमदार फीचर्समुळे हा फोन बाजारात नक्कीच धुमाकूळ घालेल, असा अंदाज टेक विश्लेषक वर्तवत आहेत.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
सोन्याच्या बांगड्या पडतील फिक्या, बेन्टेक्सच्या या ५ बांगड्या करा
Recommended image2
Night Serum: झोपण्यापूर्वी लावा हे घरगुती सीरम, सकाळी हात-पाय होतील बेबी सॉफ्ट!
Recommended image3
DIY Bangle Box: शू-बॉक्स ते टिशू रोल, घरातल्या वस्तूंपासून बनवा क्रिएटिव्ह बांगड्यांचा बॉक्स!
Recommended image4
Engagement Mehndi: साखरपुड्यात अंगठी घालताना सगळ्यांची नजर जाईल हातांवर, पाहा 10 खास डिझाइन्स
Recommended image5
Bridal Footwear: भारी लेहंग्यासोबत स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही! हे ५ फुटवेअर आहेत बेस्ट
Related Stories
Recommended image1
नवीन फोन घेणार आहात? थोडं थांबा.. Vivo चा तब्बल 7000mAh बॅटरीवाला फोन येतोय!
Recommended image2
New Mobile: कॅमेरा प्रेमींसाठी Vivo V70 सीरीज भारतात लाँच, जाणून घ्या अधिक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved