MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Mobile Charging: चार्जिंगच्या वेळी मोबाईलचा स्फोट का होतो? या चुका टाळा...

Mobile Charging: चार्जिंगच्या वेळी मोबाईलचा स्फोट का होतो? या चुका टाळा...

Mobile Charging: मोबाईल फोनचा स्फोट झाल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकतो. पण चार्जिंग करतानाच मोबाईलचा स्फोट होण्याचा धोका जास्त का असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे आपल्याच काही चुका कारणीभूत असू शकतात.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jun 26 2026, 09:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
फोन चार्ज करताना होणाऱ्या काही सामान्य चुका
Image Credit : Asianet News

फोन चार्ज करताना होणाऱ्या काही सामान्य चुका

स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. पण तज्ज्ञ सांगतात की, फोन चार्ज करताना आपण काही सामान्य चुका करतो. यामुळे बॅटरी तर खराब होतेच, पण कधीकधी स्फोट होण्याचा धोकाही असतो. तुम्हीही या चुका करत असाल, तर आजच सावध व्हा.चार्जिंग करताना फोन वापरू नकाअनेकजण फोन चार्जिंगला लावून व्हिडिओ बघतात, गेम खेळतात किंवा बोलतात. असं केल्यामुळे बॅटरी जास्त गरम होण्याची शक्यता असते. जास्त तापमानामुळे बॅटरी फुगू शकते किंवा क्वचित प्रसंगी तिचा स्फोटही होऊ शकतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
उशीखाली किंवा गरम ठिकाणी चार्जिंग करणं टाळा
Image Credit : Asianet News

उशीखाली किंवा गरम ठिकाणी चार्जिंग करणं टाळा

काही लोक रात्री झोपताना फोन उशीखाली किंवा बेडवर ठेवून चार्ज करतात. यामुळे फोनमधून बाहेर पडणारी उष्णता अडकून राहते आणि बॅटरी जास्त गरम होते. यामुळे आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका वाढू शकतो.प्रत्येक वेळी 100% चार्जिंग करणं चांगलं नाहीमोबाईलची बॅटरी प्रत्येक वेळी 100% चार्ज केल्यास तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अनेक तज्ज्ञांच्या मते, बॅटरी 20% ते 80% दरम्यान ठेवणं सर्वात उत्तम आहे. यामुळे बॅटरीचं आयुष्य वाढायला मदत होते.

Related Articles

Related image1
Mobile Charger काळा पडलाय? या ट्रिक्सने करा स्वच्छ
Related image2
Phone Charging Mistakes: कोणत्या सवयींमुळे मोबाईल फोनची बॅटरी लगेच होते खराब?
34
रात्रभर चार्जिंग आणि बनावट चार्जरचा वापर टाळा
Image Credit : Asianet News

रात्रभर चार्जिंग आणि बनावट चार्जरचा वापर टाळा

फोन पूर्ण चार्ज झाल्यावरही तो चार्जरला जोडून ठेवल्यास बॅटरी आणि चार्जर दोघांसाठीही नुकसानदायक ठरू शकतं. विशेषतः रात्रभर चार्जिंगला लावण्याची सवय टाळलेलीच बरी.बनावट किंवा हलक्या दर्जाचा चार्जर वापरू नकास्वस्तात मिळणाऱ्या बनावट चार्जरमध्ये योग्य व्होल्टेज आणि सुरक्षेचे निकष पाळलेले नसतात. यामुळे बॅटरी तर खराब होतेच, पण शॉर्ट सर्किट आणि स्फोटाचा धोकाही वाढतो. त्यामुळे नेहमी कंपनीचा ओरिजिनल किंवा सर्टिफाइड चार्जरच वापरा.
44
बॅटरीच्या सुरक्षेसाठी या टिप्स फॉलो करा
Image Credit : Gemini

बॅटरीच्या सुरक्षेसाठी या टिप्स फॉलो करा

फोन थेट सूर्यप्रकाशात चार्जिंगला लावू नका.चार्जिंग करताना फोनचं जाड कव्हर काढून ठेवा.बॅटरी फुगलेली दिसल्यास, ताबडतोब सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवा.चार्जिंग पोर्ट गरम होत असेल किंवा विचित्र वास येत असेल, तर चार्जिंग करणं लगेच थांबवा.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kitchen Tips: घरच्या डाळीला हॉटेलसारखी चव हवीये? फोडणी देताना वापरा सीक्रेट टिप्स
Recommended image2
Tatkaal Passport Scheme : तत्काळमध्ये असा काढा पासपोर्ट, वाचा अर्जाच्या प्रक्रियेसह संपूर्ण माहिती सविस्तर
Recommended image3
Chanakya Niti: चाणक्यांनी आधीच सांगितलंय.... या मुलींपासून चार हात लांबच राहा!
Recommended image4
Car Market: आरामदायी प्रवास होणार आणखी खास, Citroen ची नवीन Comfort Edition!
Recommended image5
Car Market: काळ्या रंगाच्या कारला अपघातांचा धोका जास्त का असतो, जाणून घ्या अधिक!
Related Stories
Recommended image1
Mobile Charger काळा पडलाय? या ट्रिक्सने करा स्वच्छ
Recommended image2
Phone Charging Mistakes: कोणत्या सवयींमुळे मोबाईल फोनची बॅटरी लगेच होते खराब?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved