- Home
- Utility News
- म्हाडाची मोठी लॉटरी! मुंबईच्या 'महत्वाच्या' लोकेशनवर मिळणार हक्काचं घर; वांद्रे पूर्वमध्ये राहण्याचं स्वप्न होणार साकार
म्हाडाची मोठी लॉटरी! मुंबईच्या 'महत्वाच्या' लोकेशनवर मिळणार हक्काचं घर; वांद्रे पूर्वमध्ये राहण्याचं स्वप्न होणार साकार
Mhada Mumbai Lottery 2026 : म्हाडा लवकरच वांद्रे पूर्व येथील प्रतिष्ठित एमआयजी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पातील घरे लॉटरीद्वारे उपलब्ध करणार आहे. बीकेसी आणि विमानतळाजवळ असलेल्या या घरांची किंमत खासगी विकासकांच्या तुलनेत कमी असेल.

म्हाडाची मोठी लॉटरी! मुंबईच्या 'महत्वाच्या' लोकेशनवर मिळणार हक्काचं घर
मुंबई : स्वप्नांच्या शहरात स्वतःचं घर असावं, असं प्रत्येक मुंबईकराला वाटतं. त्यातही जर घर वांद्रे (Bandra) सारख्या पॉश परिसरात असेल तर सोन्याहून पिवळं! म्हाडा आता मुंबईकरांसाठी अशीच एक सुवर्णसंधी घेऊन येत आहे. वांद्रे पूर्व येथील प्रतिष्ठित एमआयजी (MIG) कॉलनी पुनर्विकास प्रकल्पातील घरे आगामी लॉटरीमध्ये उपलब्ध होणार आहेत.
म्हाडाला घरे कशी उपलब्ध झाली?
म्हाडाच्या जुन्या वसाहतींचा जेव्हा खासगी विकासकांमार्फत पुनर्विकास होतो, तेव्हा ठराविक कोठ्यातील तयार घरे म्हाडाला विनामूल्य मिळतात. हीच हक्काची आणि दर्जेदार घरे आता सर्वसामान्यांसाठी लॉटरीद्वारे खुली केली जाणार आहेत.
वांद्रे पूर्वच का? काय आहेत खास वैशिष्ट्ये?
वांद्रे परिसरात घर मिळणे ही केवळ गुंतवणूक नसून ती एक लाइफस्टाइल आहे.
कनेक्टिव्हिटीचा किंग: बीकेसी (BKC), विमानतळ आणि वांद्रे-वरळी सी-लिंक अगदी काही मिनिटांच्या अंतरावर.
आलिशान परिसर: टॉप दर्जाच्या शाळा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि हाय-एंड रेस्टॉरंट्सची रेलचेल.
खिशाला परवडणारी किंमत: खासगी बिल्डर्सच्या तुलनेत म्हाडाची घरे अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतात, हे या लॉटरीचे सर्वात मोठे आकर्षण आहे.
अशी करा आजपासूनच तयारी!
ही लॉटरी कधीही जाहीर होऊ शकते, त्यामुळे ऐनवेळी धावपळ नको म्हणून खालील गोष्टी तयार ठेवा.
कागदपत्रे: डोमिसाईल सर्टिफिकेट (अधिवास प्रमाणपत्र) आणि अद्ययावत उत्पन्न प्रमाणपत्र काढून ठेवा.
आर्थिक नियोजन: घराची संभाव्य किंमत लक्षात घेऊन तुमची 'होम लोन' पात्रता तपासा.
अधिकृत अपडेट्स: घरांची नेमकी संख्या आणि उत्पन्न गट (Income Group) लवकरच म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होतील.
महत्त्वाची टीप
म्हाडाच्या घरांसाठी आता नवी नियमावली आणि ऑनलाइन प्रक्रिया अधिक सुटसुटीत झाली आहे, त्यामुळे वेळीच नोंदणी करणे फायदेशीर ठरेल.

