- Home
- Utility News
- RRB Recruitment 2026 : रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 40 वर्षांपर्यंतच्या तरुणांना मिळणार संधी; 'असा' करा अर्ज
RRB Recruitment 2026 : रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 40 वर्षांपर्यंतच्या तरुणांना मिळणार संधी; 'असा' करा अर्ज
RRB Recruitment 2026 : रेल्वे भरती मंडळाने (RRB) २०२६ साठी विविध पदांवर मेगा भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये चीफ लॉ असिस्टंट, ज्युनिअर ट्रान्सलेटर अशा पदांचा समावेश असून, विशेष म्हणजे कमाल वयोमर्यादा ४० वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
मुंबई : रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी २०२६ सालातील सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) विविध रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली होती, अशांसाठी सरकारने कमाल वयोमर्यादेत शिथिलता देऊन ४० वर्षांपर्यंत अर्ज करण्याची संधी दिली आहे.
'या' रिक्त पदांसाठी होणार भरती
रेल्वेच्या Isolated Category अंतर्गत खालील महत्त्वाच्या पदांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे.
चीफ लॉ असिस्टंट (Chief Law Assistant)
पब्लिक प्रॉसिक्युटर (Public Prosecutor)
ज्युनिअर ट्रान्सलेटर (Junior Translator)
सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant)
लॅब असिस्टंट (Lab Assistant)
पगार आणि शैक्षणिक पात्रता
निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार आकर्षक पगार दिला जाणार आहे.
मानधन: १८,९०० ते ४४,९०० रुपयांपर्यंत (प्रति महिना).
शिक्षण: पदांनुसार १२वी विज्ञान, पदवी, पदव्युत्तर शिक्षण किंवा कायद्याची पदवी (LLB) आवश्यक.
वयोमर्यादा: काही पदांसाठी कमाल वय ४० वर्षे, तर आरक्षित वर्गाला नियमानुसार सवलत.
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
या भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
१. अधिकृत संकेतस्थळ www.rrbapply.gov.in ला भेट द्या.
२. अर्जासाठी ३१ जानेवारी २०२६ ही अंतिम तारीख आहे.
३. अर्ज करताना लाईव्ह फोटो, डिजिटल स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे जवळ ठेवा.
महत्त्वाचे मुद्दे
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून 'RRB Isolated Categories 2025 Notification' ही PDF काळजीपूर्वक डाऊनलोड करून वाचावी.

