सार
तुम्ही एखाद्या रोजगाराच्या शोधात असाल तर ई-कॉमर्स कंपन्यांकडे रोजगाराची संधी आहे. अशातच मीशो कंपनीने दावा केला आहे की, सणासुदीच्या काळात आम्ही 8.5 लाख रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
Meesho Jobs During Festive Season : ई-कॉमर्स कंपनी मीशोवरच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत वस्तू खरेदी करता येतात. याशिवाय खेड्यापाड्यातील आणि लहान स्तरावरील व्यावसायांनाही मीशो प्लॅटफॉर्मवर आपला व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते. अशातच नुकत्याच मीशो कंपनीने गुरुवारी (5 सप्टेंबर) म्हटले की, सणासुदीच्या आधीच त्यांच्या विक्रेत्या आणि लॉजिस्टिक नेटवर्क अंतर्गत 8.5 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामागील मोठे कारण म्हणजे लहान शहरांचा समावेश आहे. म्हणजेच कंपनीने लहान शहरांमध्ये उपनगरांच्या तुलनेत अधिक रोजगार निर्माण केले आहेत. मीशो कंपनी त्यांच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्वस्त दरात प्रोडक्ट्स विक्री करण्यासाठी ओखळली जाते.
मीशो कंपनीने नक्की काय म्हटलेय?
मीशो कंपनीने एका विधानात म्हटले की, आगामी सणासुदीच्या काळात विक्रीत होणारी वाढ लक्षात घेता आम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत आहोत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 70 टक्क्यांनी रोजगराच्या संधीत वाढ झाली आहे. मीशो कंपनीचे मुख्य अनुभवी अधिकारी सौरभ पांडेय यांनी म्हटले की, आम्हाला आश्चर्य वाटतेय सणासुदीच्या काळात आमच्यामुळे 8.5 लाख मौसमी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेच. यामध्ये बहुतांश रोजगार तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीतील शहारातील आहे.
कंपनीकडून थेट 5 लाख जणांची भरती
मीशोच्या अधिकाऱ्यांच्या मते, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत विक्रेत्यांनी आगामी सणासुदीच्या काळात वाढत्या विक्रीच्या मागणीला लक्षात घेता जवळजवळ 5 लाख जणांना नोकरीवर ठेवले आहे. याशिवाय 3.5 लाख अस्थायी रोजगारही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
प्रोडक्ट्सची स्वस्तात विक्री
भारतातील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनी मीशोने अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या दिग्गज ई-कॉमर्स कंपन्यांना मोठी टक्कर दिली आहे. मीशोच्या प्लॅटफॉर्मवर प्रति महिन्याला 12 कोटी अॅक्टिव्ह युजर्सची संख्या आहे. यामागील खास गोष्ट अशी की, मीशोच्या प्लॅटफॉर्मवर 80 टक्केजण लहान व्यवसायिक आणि किरकोळ दुकानदारांना संधी दिली जातो. याशिवाय 95 टक्के प्रोडक्ट्स ब्रँडशिवाय विक्री केले जातात. हेच कारण आहे की, मीशो प्लॅटफॉर्मवर स्वस्त दरात प्रोडक्ट्सची खरेदी नागरिकांना करता येते.
युनिकॉर्नच्या स्तरावर पोहोचलीय कंपनी
मीशो कंपनीला मार्केटमध्ये लाँच होऊन अधिक काळ झालेला नाही. तरीही कंपनीने स्टार्ट अप व्यवसायाच्या क्षेत्रात युनिकॉर्नचा स्तर पार केला आहे. 25 मार्च, 2024 रोजी कंपनीचे वॅल्यूएशन झाले होते. त्यावेळी कंपनीचे मार्केट कॅप 3.9 अरब डॉलर असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, कंपनीचे वॅल्यूएशन वर्ष 2021 मधील 4.9 अरब डॉलरच्या मार्केट कॅपपेक्षा 20 टक्के कमी होते. पण कंपनीला त्यावेळी 57 कोटी डॉलरची आर्थिक मदत मिळाली होती. मीशो कंपनीत सॉफ्ट बँकांनीही पैसे गुंतवले आहेत.
आणखी वाचा :
तुमच्या Aadhaar Card चा कोणी गैरवापर तर करत नाही ना?, असे करा चेक!
बँकेतून काढलेल्या नोटा तपासा!, अन्यथा होईल मोठे नुकसान; पाहा धक्कादायक Video