Maruti Wagon R Dominates Hatchback Sales in February 2026 : फेब्रुवारी २०२६ मध्ये मारुती वॅगनआर पुन्हा एकदा हॅचबॅक सेगमेंटमध्ये टॉपवर पोहोचली आहे. या महिन्यात गाडीच्या १४,८८५ युनिट्सची विक्री झाली.
Maruti Wagon R Dominates Hatchback Sales in February 2026 : फेब्रुवारी २०२६ मध्ये मारुतीची वॅगनआर पुन्हा एकदा हॅचबॅक सेगमेंटमध्ये नंबर वन ठरली आहे. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये ही सातव्या क्रमांकावर होती. या गाडीने स्विफ्ट, बलेनो आणि स्कॉर्पिओसारख्या गाड्यांनाही मागे टाकलं. आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०२६ मध्ये १४,८८५ लोकांनी मारुती सुझुकीची ही हॅचबॅक कार खरेदी केली. या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ४.९८ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे, वॅगनआरच्या सीएनजी व्हेरिएंटमध्ये ३३ किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज मिळतं. चला, देशातील टॉप १० गाड्यांवर एक नजर टाकूया.
मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यात नेव्हिगेशनसह ७-इंचाची स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, क्लाउड-आधारित सेवा, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, AMT मध्ये हिल-होल्ड असिस्ट, ४ स्पीकर, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्टिअरिंग व्हीलवर माउंट केलेले कंट्रोल्स मिळतात.
या गाडीला ड्युअलजेट ड्युअल VVT टेक्नॉलॉजीसह १.०-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल आणि १.२-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनमधून पॉवर मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार, १.०-लिटर इंजिन २५.१९ किमी/लिटर मायलेज देतं. तर, सीएनजी व्हेरिएंट (जो LXI आणि VXI ट्रिममध्ये उपलब्ध आहे) ३४.०५ किमी/किलो इतकं जबरदस्त मायलेज देतो. याशिवाय, १.२-लिटर के-सीरिज ड्युएलजेट इंजिन २४.४३ किमी/लिटर (ZXI AGS /ZXI+ AGS ट्रिम्समध्ये) मायलेज देतं.
मारुती वॅगनआरच्या बेसिक LXI पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ४.९८ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. आरटीओ, इन्शुरन्स आणि इतर खर्च धरून ऑन-रोड किंमत सुमारे ५.६३ लाखांपर्यंत जाते. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर तुम्ही फक्त ५०,००० रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही कार खरेदी करू शकता. मात्र, शहर आणि व्हेरिएंटनुसार किमतींमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.


