Maruti Suzuki Brezza : दिवाळीपूर्वी मारुती सुझुकी ब्रेझावर १.१२ लाख रुपयांपर्यंत मोठी सूट दिली जात आहे. नवीन जीएसटी नियमांमुळे या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंटच्या किमती कमी झाल्या आहेत.
Maruti Suzuki Brezza : भारतीय कार बाजारात SUV सेगमेंटमध्ये बदल घडवणारी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती सुझुकी ब्रेझावर दिवाळीच्या आधी सूट दिली जात आहे. २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन जीएसटीमुळे, व्हेरिएंटनुसार ब्रेझाच्या किमतीत ४३,००० रुपयांपासून ते १.१२ लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय, ऑटोमोबाईल कंपनी आणि तिच्या डीलरशिप्सकडून सणासुदीच्या काळात मिळणारे डिस्काउंट आणि ऑफर्स ग्राहकांसाठी ही डील अधिक आकर्षक बनवत आहेत.

या व्हेरिएंटवर सर्वाधिक सूट
मारुती सुझुकी ब्रेझाच्या टॉप-एंड ZXi प्लस AT व्हेरिएंटवर सर्वाधिक सूट मिळत आहे. या व्हेरिएंटची किंमत १.१२ लाख रुपयांनी कमी झाली आहे. बेस-स्पेक LXi व्हेरिएंटवर ४३,००० रुपयांची सूट देण्यात आली आहे. ब्रेझा पेट्रोल आणि पेट्रोल-सीएनजी पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. व्हेरिएंटनुसार, या एसयूव्हीच्या सीएनजी व्हेरिएंटवर ४७,००० ते ९०,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. Arena रिटेल नेटवर्कद्वारे विकल्या जाणाऱ्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी मारुती सुझुकी ब्रेझा एक आहे. जीएसटीमुळे किंमत कमी झाल्यानंतर, मारुती सुझुकी ब्रेझाची एक्स-शोरूम किंमत ८.६९ लाख रुपयांवरून कमी होऊन आता ८.२६ लाख रुपये झाली आहे. टॉप मॉडेलची किंमत १३.७८ लाख रुपयांवरून कमी होऊन १२.८६ लाख रुपये झाली आहे.
हेही वाचा - भावा, आता घेऊन टाक..! 'होंडा ॲक्टिव्हा' पेक्षाही स्वस्त 5 लोकप्रिय बाईक्स, Top 5 Budget Friendly Moped!

लक्षात ठेवा, येथे नमूद केलेली सूट विविध प्लॅटफॉर्मद्वारे कारवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटवर आधारित आहे. ही सूट देशातील विविध राज्ये, शहरे, डीलरशिप, स्टॉक, रंग आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकते. म्हणजेच, तुमच्या शहरात किंवा डीलरकडे या सवलतीची रक्कम कमी-जास्त असू शकते. अशा परिस्थितीत, कार खरेदी करण्यापूर्वी अचूक सवलत आणि इतर माहितीसाठी तुमच्या जवळच्या स्थानिक डीलरशी संपर्क साधा.
मारुतीच्या कार बजेट फ्रेंडली असतात. त्याचे स्पेअर पार्ट कुठेही मिळतात. तसेच गाडी बिघडली किंवा काही तांत्रिक विषय आला तर ती कुठेही रिपेअर करता येते. यामुळे मारुतीच्या कारला चांगला प्रतिसाद मिळतो. ब्रिझा ही कार कॉम्पॅक्ट एसयुव्हीसारखी दिसते. तशीच ती फॅमिली कारही आहे. त्यामुळे ब्रिझा घेण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे.
हेही वाचा -Royal Enfieldची 'ही' गाडी दिवाळीला आणा घरात, कमी झालेली किंमत वाचून येईल चक्कर
ब्रिझाच्या सीएनजी व्हेरायंटला ग्राहकांची चांगली पसंती लाभत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असून सीएनजी एक चांगला पर्याय आहे. ईव्हीच्या कारची रेंज कमी असते. त्यामुळे लांब पल्ल्यावर जायचे असल्यास ती योग्य पर्याय ठरत नाही. त्याऐवजी सीएनजीचा दर कमी आहे आणि त्याचा मायलेजही जास्त मिळतो. ब्रिझा ही उत्कृष्ट फॅमिली कार आहे. लहान कुटुंबासाठी तर ती उत्तम पर्याय ठरत आहे. शिवाय जीएसटी कमी झाल्याने किमतीही खाली आल्या आहेत. त्यामुळे सणासुदीला या कारची खरेदी वाढत असल्याचे दिसून येते.


