- Home
- Utility News
- Maharashtra SSC Board Exam Result 2025 : दहावीचा निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता, जाणून घ्या कुठे आणि कसा पहाल
Maharashtra SSC Board Exam Result 2025 : दहावीचा निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता, जाणून घ्या कुठे आणि कसा पहाल
SSC Board Exam Result 2025 Update : महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून आता निकालाची वाट पाहिली जात आहे. अशातच निकाल कुठे आणि कसा पहायचा हे जाणून घेऊया. याशिवाय निकालाची तारीख काय असू शकते हे देखील पहा.
| Updated : Apr 12 2025, 11:38 AM
1 Min read
Share this Photo Gallery
- FB
- TW
- Linkdin
15
)
Image Credit : social media
महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा 2025 निकाल
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकेंडरी एज्युकेशन, पुणे यांच्याकडून लवकरच महाराष्ट्राच्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. निकाल 15 मे दरम्यान लागू शकतो. निकाल पाहण्याची अधिकृत लिंक देखील दिली जाईल.
25
Image Credit : Getty
महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा 2025
- दहावी बोर्डाचे वेळापत्रक 21 नोव्हेंबर, 2024 रोजी जाहीर करण्यात आले होते.
- 21 फेब्रुवारी ते 17 मार्च, 2025 पर्यंत परीक्षा पार पडली.
- निकाल येत्या 15 मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे.
- उत्तरपत्रिकेच्या व्हेरिफिकेशन प्रोसेसची तारीख मे-जून 2025 दरम्यान असू शकते.
35
Image Credit : Getty
निकाल तपासून पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट
- mahahsscboard.in
- mahresult.nic.in
- sscresult.mkcl.org
45
Image Credit : Social Media
असा तपासून पहा निकाल
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना निकाल लागल्यानंतर डाउनलोड करता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल. दहावीचा निकाल कसा डाउनलोड करू शकता हे खाली पहा.
55
Image Credit : Getty
असा करा डाउनलोड निकाल
- mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in/mr या संकेतस्थळाला भेट द्या.
- SSC Examination March - 2025 Result या पर्यायावर क्लिक करा.
- विचारलेली माहिती जसे की, आईचे पहिले नाव (जसे हॉल तिकीटावर दिले आहे)
- View Result पर्यायावर क्लिक करा.
- बोर्डाच्या निकालाची ऑनलाइन मार्कशीट तुमच्यासमोर उघडली जाईल.
- स्क्रिनवर खाली स्क्रोल केल्यानंतर मार्कशीट डाउनलोड करुन प्रिंट आउट काढू शकता.