LPG Gas e-KYC Update : एलपीजी गॅस सिलेंडरचं ई-केव्हासी करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण करा. यासाठी कोणत्याही ऑफिसमध्ये जायची गरज नाही. मोबाईलवरुन ही प्रक्रिया करता येईल.

मुंबई : एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही कोणताही सिलेंडर इंडेन, भारत गॅस, एचपी गॅसचा वापर करत असाल, तर ई-केव्हासी प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे. ई-केव्हायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२६ आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी अद्याप व्हेरिफिकेशन केलेलं नाही त्यांनी २३ तारखेच्या आत ते पूर्ण करणं गरजेचं आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही लाइन लावण्याची गरज नाही. तसंच LPG Gas डिस्ट्रीब्यूटरकडे जाण्याची गरज नाही. ई-केव्हासी व्हेरिफिकेशनचं काम तुम्ही घरबसल्या स्मार्टफोनवरुनच करू शकता. हे काम फोनवरुन आधार नंबर आणि एलपीजी कनेक्शनशीसंबंधी असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करुनच करू शकता.

२३ ऑगस्टपर्यंत e-KYC केलं नाही, तर काय होईल?

२३ ऑगस्टपर्यंत तुम्ही ई-केव्हायसी पूर्ण केलं नाही, तर तुमच्या बँक खात्यात येत असलेली कोणतीही सरकारी रक्कम अर्थात सरकारी अनुदान तुमच्या खात्यात येणार नाही. उज्ज्वला योजनेअंतर्गत येणारे ३०० रुपये बंद केले जाऊ शकतात. तसंच तुमचं एलपीजी गॅस कनेक्शन सस्पेंड किंवा डॉरमॅट अर्थात निष्क्रिय केलं जाऊ शकतं. ई-केव्हायसी पूर्ण केलं नाही तर व्हॉट्सॲपवरुन गॅस रिफिल बुक केलं जाणार नाही.

LPG e-KYC करण्यासाठी काय - काय लागेल?

- आधार कार्ड/आधार क्रमांक

- एलपीजी कनेक्शनशी जोडलेला मोबाईल नंबर

- एलपीजी कंज्यूमर नंबर किंवा एलपीजी आयडी

- इंटरनेट असलेला स्मार्टफोन

- एलपीजी कोणता आहे, त्या प्रोव्हाइडरचं ऑफिशिअल अॅप

भारत गॅस (Bharat Gas) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी काय आहे नियम?

- भारत गॅस वापरणारे ग्राहक 'Hello BPCL' अॅपचा वापर करा. यात तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन लॉगइन करा.

- होमपेजवर LPG सेक्शनवर जाऊन LPG ID वर क्लिक करा.

- त्यानंतर e-KYC आधार ऑथेंटिकेशन सेक्शनवर क्लिक करा.

- आता मोबाईलवर OTP टाकून Aadhaar FaceRD द्वारे चेहरा स्कॅन करा.

एचपी गॅस (HP Gas) ग्राहक कसं करा व्हेरिफाय?

- एचपी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांनी आधी HP Pay APP ओपन करा.

- मोबाईल नंबरने रजिस्टर किंवा साइन-इन करा.

- आता डॅशबोर्डवर LPF/Gas Connection वर क्लिक करा.

- त्यानंतर आधार ऑथेंटिकेशनवर क्लिक करा.

- आता आधारसाठी संमती द्या आणि फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया करा.