MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • LPG Gas Connection : 62 लाख गॅस कनेक्शन रद्द, तुमची सबसिडी तर थांबली नाही ना?

LPG Gas Connection : 62 लाख गॅस कनेक्शन रद्द, तुमची सबसिडी तर थांबली नाही ना?

देशभरात तब्बल ६२ लाख एलपीजी (LPG) गॅस कनेक्शन अचानक रद्द झाले आहेत. यामुळे अनेकांची गॅस सबसिडी बंद झाली आहे. पण काळजी करू नका, तुम्ही आधार e-KYC करून तुमचं कनेक्शन आणि सबसिडी पुन्हा सुरू करू शकता.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 26 2026, 02:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बोगस गॅस कनेक्शनवर सरकारची मोठी कारवाई
Image Credit : pinterest

बोगस गॅस कनेक्शनवर सरकारची मोठी कारवाई

देशभरातील गॅस ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारने लाखो एलपीजी (LPG) कनेक्शन अचानक रद्द केले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिलच्या सुरुवातीला देशात ३३.३९ कोटी ॲक्टिव्ह गॅस कनेक्शन होते. पण सप्टेंबरच्या सुरुवातीला हा आकडा ३२.७७ कोटींवर आला.

म्हणजेच अवघ्या काही महिन्यांत तब्बल ६२ लाख कनेक्शन बंद झाले आहेत. यामुळे या ग्राहकांना मिळणारी सबसिडीही सरकारने थांबवली आहे. बऱ्याच काळानंतर गॅस ग्राहकांच्या संख्येत एवढी मोठी घट झाल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
आता फक्त खऱ्या लाभार्थ्यांनाच मिळणार गॅस सबसिडी
Image Credit : X

आता फक्त खऱ्या लाभार्थ्यांनाच मिळणार गॅस सबसिडी

गॅस कनेक्शन रद्द होण्याचं आणि सबसिडी थांबण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आधार e-KYC. सरकारने बोगस कनेक्शन शोधण्यासाठी आणि एकाच पत्त्यावर असलेली अनेक कनेक्शन बंद करण्यासाठी हा नियम सक्तीचा केला आहे. खऱ्या लाभार्थ्यांनाच सबसिडी मिळावी हा यामागचा उद्देश आहे.

१९ सप्टेंबरपर्यंत देशातील २७.४३ कोटी ग्राहकांनी आपली e-KYC पूर्ण केली होती. पण ज्यांनी ३० सप्टेंबरच्या डेडलाईनपर्यंत हे काम केलं नाही, त्यांची सबसिडी सरकारने १ ऑक्टोबरपासून पूर्णपणे थांबवली आहे.

Related Articles

Related image1
Rent vs EMI : भाड्याच्या घरात राहणं योग्य की EMI वर घर घेणं? काय आहे बेस्ट ऑप्शन?
Related image2
EPF Withdrawal : नोकरी सोडल्यावर पीएफचे पूर्ण पैसे काढायचेत? आता 1 वर्ष वाट पाहावी लागणार
35
या कारवाईचा फटका नेमका कोणाला बसला?
Image Credit : ANI

या कारवाईचा फटका नेमका कोणाला बसला?

सरकार आणि तेल कंपन्यांनी (OMCs) दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईचा फटका प्रामुख्याने तीन प्रकारच्या ग्राहकांना बसला आहे:

  • e-KYC न केलेले ग्राहक: ज्यांनी दिलेल्या मुदतीत गॅस एजन्सीमध्ये जाऊन आधार केवायसी पूर्ण केली नाही.
  • बोगस आणि दुहेरी कनेक्शन: ज्यांनी नियमांचे उल्लंघन करून एकाच व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या नावे अनेक कनेक्शन घेतले होते.
  • निष्क्रिय अकाउंट्स: असे ग्राहक ज्यांनी सलग अनेक महिने गॅस सिलिंडर बुकच केला नाही आणि त्यांचे अकाउंट बंद पडले होते.
45
मध्यपूर्वेतील युद्ध आणि पीएनजी (PNG) गॅसचा वाढता वापर
Image Credit : ANI

मध्यपूर्वेतील युद्ध आणि पीएनजी (PNG) गॅसचा वाढता वापर

गॅस कनेक्शन कमी होण्यामागे फक्त प्रशासकीय कारणे नाहीत, तर आंतरराष्ट्रीय घडामोडीही जबाबदार आहेत. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमधून येणाऱ्या एलपीजीच्या आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी नवीन कनेक्शन देणं कमी केलं आहे.

दुसरीकडे, शहरांमध्ये पाईपलाईनद्वारे थेट घरी येणाऱ्या पीएनजी (PNG) गॅसचा वापर वेगाने वाढतोय. आतापर्यंत ६ लाखांहून अधिक ग्राहकांनी पीएनजी गॅस घेतला असून त्यांनी आपले जुने एलपीजी कनेक्शन परत केले आहेत. यामुळेही एलपीजी ग्राहकांची संख्या घटली आहे.

55
सबसिडी पुन्हा कशी मिळवायची?
Image Credit : Gemini AI

सबसिडी पुन्हा कशी मिळवायची?

तुमचं एलपीजी कनेक्शन कट होऊ नये आणि थांबलेली सबसिडी पुन्हा मिळावी, यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्ही थेट तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांच्या स्कॅनिंगद्वारे (Iris) आधार e-KYC पूर्ण करू शकता.

याशिवाय, गॅस कंपन्यांच्या अधिकृत ॲप्स किंवा वेबसाईटवरूनही तुम्ही हे काम घरबसल्या करू शकता. केवायसी पूर्ण होताच तुमची सबसिडी पुन्हा सुरू होईल.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
SBI Cash Withdrawal Charges : SBI मध्ये तुमचं खातं आहे का? महिन्यातून किती वेळा फ्री पैसे काढता येतील? नियम काय?
Recommended image2
Health Insurance Renewal : वेळेवर पॉलिसी रिन्यू करायला विसरू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान
Recommended image3
Insurance Mis-selling : चुकीची पॉलिसी विकल्यास एजंटचं कमिशन परत घेणार, कोटकचा रिपोर्ट
Recommended image4
EPF Withdrawal : नोकरी सोडल्यावर पीएफचे पूर्ण पैसे काढायचेत? आता 1 वर्ष वाट पाहावी लागणार
Recommended image5
Gold Rate Today : आजचे सोने-चांदीचे दर काय आहेत? मुंबईसह प्रमुख शहरातील लेटेस्ट भाव इथे तपासा
Related Stories
Recommended image1
Rent vs EMI : भाड्याच्या घरात राहणं योग्य की EMI वर घर घेणं? काय आहे बेस्ट ऑप्शन?
Recommended image2
EPF Withdrawal : नोकरी सोडल्यावर पीएफचे पूर्ण पैसे काढायचेत? आता 1 वर्ष वाट पाहावी लागणार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved