आपण जे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स खातो, त्यावर लिव्हर नियंत्रण ठेवते. शरीराच्या कार्यासाठी लागणारे इतर फॅट्स आणि प्रोटीन्स हाताळण्याचं कामही लिव्हरच करतं. तुमच्या लिव्हरचं आरोग्य जपायचं असेल, तर रोजच्या आहारात कोणत्या गोष्टी असायला हव्यात, ते जाणून घ्या.

लिव्हरचं आरोग्य वाढवण्यासाठी रोज खा हे ७ सुपरफूड्स

आपण खात असलेले प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स लिव्हर नियंत्रित करत असतं. शरीराच्या इतर कार्यांसाठी लागणारे फॅट्स आणि प्रोटीन्स मॅनेज करण्याचं कामही लिव्हरच करतं. एकंदर आरोग्यासाठी लिव्हर निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. लिव्हर खराब झालं तर मेटाबॉलिझमच्या समस्या आणि लिव्हरचे आजार होऊ शकतात. लिव्हर खराब होण्यामागे टाईप २ डायबिटीस हे एक प्रमुख कारण आहे. म्हणूनच, लिव्हरचं आरोग्य सुधारण्यासाठी आहारात काही विशिष्ट गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे.

पालेभाज्यांमुळे लिव्हरचं कार्य सुधारतं

पालक आणि मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. यातील नैसर्गिक वनस्पती घटक आरोग्यासाठी उत्तम असतात. आहारात वेगवेगळ्या पालेभाज्यांचा समावेश केल्यास लिव्हरचं काम सुरळीत चालतं.

हळद फॅटी लिव्हरच्या आजाराची लक्षणे रोखते

हळदीमध्ये 'करक्युमिन' नावाचा नैसर्गिक घटक असतो. तुम्ही हळद भाजीत, आमटीत किंवा दुधात मिसळून वापरू शकता. काही लहान अभ्यासांनुसार, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराची काही लक्षणे कमी करण्यासाठी हळद उपयुक्त ठरू शकते.

लसणातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म लिव्हरसाठी उत्तम

लसणामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म लिव्हरच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. प्राण्यांवर झालेल्या काही संशोधनांमध्ये, लसणाच्या वापरामुळे 'हेपॅटिक स्टियाटोसिस' (लिव्हरमध्ये फॅट जमा होणे) टाळता येत असल्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

रामायण चित्रपटाच्या कमाईवरून वाद सुरू असतानाच विवेक ओबेरॉयचं वक्तव्य व्हायरल!

ओट्समध्ये विरघळणारे फायबर (सोल्युबल फायबर) जास्त असते

ओट्समध्ये सोल्युबल फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. फायबरयुक्त अन्न वजन नियंत्रणासाठीही उपयुक्त ठरते; नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराचा धोका कमी करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे.

अक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात

अक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात. तेलकट पदार्थांऐवजी थोडे मीठ नसलेले अक्रोड खाणे हृदय आणि लिव्हर दोन्हीसाठी चांगले असते.

सॅल्मन, सार्डिन मासे लिव्हरचे रक्षण करतात

सॅल्मन, सार्डिन आणि मॅकेरल यांसारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स भरपूर असतात. हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. आठवड्यातून एक-दोनदा मासे खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स, फायबर, अँटीऑक्सिडंट्स असतात

बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. काही संशोधनांनुसार, बीटरूटचा रस प्यायल्याने लिव्हरमध्ये फॅट जमा होण्याचा म्हणजेच 'हेपॅटिक स्टियाटोसिस'चा (hepatic steatosis) धोका कमी होतो.

गोड पेयांऐवजी विनासाखरेचा ग्रीन टी प्या

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स (catechins) नावाचे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात. साखरेच्या पेयांऐवजी विनासाखरेचा ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी कधीही उत्तम.