- Home
- Utility News
- Women Legal Rights : लग्नानंतर महिलांना मिळतात हे कायदेशीर हक्क, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Women Legal Rights : लग्नानंतर महिलांना मिळतात हे कायदेशीर हक्क, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
मुंबई - लग्नानंतर महिला एक घर सोडून दुसऱ्या घरी जातात. लहानपणापासून राहिलेले घर परके होते आणि नवीन घर आपले. लग्नानंतर महिलांना मिळणाऱ्या ६ महत्त्वाच्या कायदेशीर हक्कांबद्दल जाणून घ्या. प्रत्येक महिलेने हे हक्क माहित असणे गरजेचे आहे.

भारतीय राज्यघटनेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण
भारतीय राज्यघटना महिलांच्या हक्कांचे संरक्षण करते. आपली राज्यघटना सर्वसमावेशक आहे. यात महिलांसाठी विशेष अधिकार आहेत. लग्नानंतर पत्नीला पती, मालमत्ता, सुरक्षा आणि घटस्फोटाबाबत कायदेशीर हक्क मिळतात. जाणून घ्या ६ महत्त्वाचे हक्क.
स्त्रीधन म्हणजे लग्नात मिळालेली मालमत्ता (Right to Streedhan)
स्त्रीधन म्हणजे लग्नात मिळालेली मालमत्ता, पैसे, दागिने. हे सर्व तिचेच असतात. पती किंवा सासरच्यांना यावर कायदेशीर हक्क नसतो. बऱ्याच वेळा ही स्त्रीधन तिचे परवानगी न घेता विकले जाते. हे चुकीचे आहे. तिची परवानगी घेतल्यानंतरच या मालमत्तेची विक्री करता येते. तसेच घटस्फोट झाला असेल तर ही स्त्रीधन तिला द्यावे लागते.
छळ झाल्यास तक्रार करता येते (Right to live with dignity and without cruelty):
महिलांना सन्मानाने आणि छळाविना कौटुंबिक आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या या अधिकारावर गदा आणता येत नाही. छळ झाल्यास महालांना पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळाची तक्रार करता येते. यातील कलम अतिशय कठोर आहेत. त्यामुळे सासरच्या मंडळीवर लगेच कारवाई करावी लागते. तसेच न्यायालयातही महिलांच्या बाजुने निकाल लागण्याची जास्त शक्यता असते.
निर्वाह भत्ता द्यावा लागतो (Right to Maintenance):
घटस्फोट झाला तरी पतीने पत्नीला निर्वाह भत्ता द्यावा लागतो. लग्न मोडले म्हणजे सगळे संपले असे होत नाही. पत्नीला निर्वाह भत्ता म्हणजेच पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. तो टाळता येत नाही. न्यायालयात केस दाखल केली तर पोटगीची प्रलंबित रक्कमही अदा करावी लागते. त्यामुळे सहजा कोणताही पती पोटगीसाठी नाही म्हणत नाही. हा अधिकार महिलांना घटनेने दिली आहे.
पतीच्या घरात राहण्याचा हक्क (Right to Matrimonial Home):
पत्नीला पतीच्या घरात राहण्याचा हक्क आहे. तिला घराबाहेर काढणे बेकायदेशीर आहे. पतीचे घर हे पत्नीचेही असल्याचे कायदेशीरपणे समजले जाते. त्यामुळे या घरात तिचाही हिस्सा पडतो. पती असा कधीही तिला घरातून काढू शकत नाही. असे केल्यास पोलिस केस दाखल होते. यात पतीला अटकही होऊ शकते. हा हक्क अतिशय महत्त्वाचा आहे.
मुलांच्या संगोपनाचा हक्क (Right to Child Custody):
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. घटस्फोटात मुलांच्या संगोपनाचा हक्क बहुतेकदा आईला मिळतो. कारण आईच मुलांचा योग्यपणे सांभाळ करु शकते. पण याचा अर्थ असा नाही की पती हात झटकून जबाबदारी टाळू शकतो. मुलांच्या संगोपनासाठी त्याला पत्नीला दिल्या जाणार्या पोटगीत वाढ करुन द्यावी लागले. त्यांचा संपूर्ण खर्च उचलावा लागतो. पत्नी नोकरीला आहे, असे म्हणूनही तो जबाबदारी झटकू शकत नाही.
पत्नी घटस्फोट घेऊ शकते (Right to Divorce):
सासरी मानसिक आणि शारीरिक छळ होत असेल तर तिला घटस्फोट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. यावेळी पोलिस प्रशासन आणि न्यायालय तिच्या बाजुने असतात. तसेच भारतीय कायदेही पत्नीच्या पारड्यात आपले वजन टाकतात. त्यामुळे तिना घटस्फोट घेण्याचा पूर्ण अधिकार असतो.

