Lava Latest Phone : भारतीय कंपनी लावाने एक जबरदस्त बजेट फोन आणला आहे. Lava Bold N4 Lite नावाचा हा फोन कमी किमतीत दमदार फीचर्स देतो. विशेष म्हणजे, फोन खराब झाल्यास कंपनी घरी येऊन दुरुस्त करून देणार आहे.

मुंबई : भारतीय मोबाईल कंपनी लावाने (Lava) ग्राहकांसाठी एक खुशखबर आणली आहे. कंपनीने आपल्या Bold स्मार्टफोन सिरीजमधील नवा मॉडेल Bold N4 Lite भारतात लॉन्च केला आहे. हा एक बजेट फ्रेंडली फोन असून त्याची किंमत बजेटमध्ये आणि फीचर्सही कमाल आहेत.

Bold N4 Lite मध्ये काय आहे खास?

या बजेट फोनमध्ये 6.56-इंचाचा डिस्प्ले, Unisoc 9863A चिपसेट आणि 5,000mAh ची दमदार बॅटरी आहे. हा फोन Android 16 Go एडिशनवर चालतो. यात 3GB रॅमसोबत व्हर्च्युअल रॅमचा सपोर्टही देण्यात आला आहे.

Lava Bold N4 Lite ची किंमत

Lava Bold N4 Lite च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत ८,०९९ रुपये आहे. पण सुरुवातीला हा फोन ७,९९९ रुपयांच्या खास किमतीत उपलब्ध असेल. या फोनची विक्री ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता Amazon वर सुरू होईल. हा फोन एम्पायर गोल्ड (Empire Gold) आणि घोस्ट सिल्व्हर (Ghost Silver) या दोन रंगांमध्ये मिळेल.

घरी बसल्या मिळणार दुरुस्ती सेवा

या फोनसोबत लावा कंपनीची 'फ्री अॅट होम सर्व्हिस' (Free At Home Service) सुद्धा मिळते. म्हणजे तुमचा फोन खराब झाल्यास, कंपनीचा माणूस थेट तुमच्या घरी येऊन तो दुरुस्त करून देईल.

हा फोन Android 16 Go एडिशनवर चालतो. लावाच्या म्हणण्यानुसार, यात कोणतेही अनावश्यक ॲप्स (bloatware) नाहीत. फोटोसाठी यात 8-मेगापिक्सलचा AI बॅक कॅमेरा आणि सेल्फी-व्हिडिओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 10W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि ऑडिओसाठी सिंगल स्पीकर दिला आहे. या फोनला MIL-STD-810H रेटिंगही मिळालं आहे.

Lava Bold N4 Lite vs Bold N2 Lite

यावर्षी एप्रिलमध्ये भारतात लाँच झालेल्या Lava Bold N2 Lite ची किंमत ७,३९९ रुपये होती. त्यात 6.75-इंचाचा HD+ 90Hz डिस्प्ले आणि Unisoc 9863A चिपसेट होता. तो फोन Android 15 Go वर चालत होता.