Philips Smartphone Launching : इलेक्ट्रॉनिक्स विश्वातील प्रसिद्ध ब्रँड फिलिप्स (Philips) आता 'फिलिप्स S7221 5G' या स्मार्टफोनमधून भारतीय बाजारात पुनरागमन करत आहे. 120Hz डिस्प्ले, 64MP AI कॅमेरा आणि 5700mAh बॅटरी अशा दमदार फीचर्ससह हा फोन लवकरच अमेझॉनवर लाँच होणार आहे.

मुंबई : भारतीय ग्राहकांच्या आवडत्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सपैकी एक असलेल्या फिलिप्सने (Philips) आता देशाच्या स्मार्टफोन बाजारात जोरदार कमबॅक करण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच 'फिलिप्स S7221 5G' (Philips S7221 5G) हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन इंडियावर (Amazon India) या फोनसाठी एक खास पेज (मायक्रोसाइट) लाईव्ह झालं आहे. त्यामुळे हा फोन फक्त अमेझॉनवरच विकला जाईल हे निश्चित झालं आहे.

120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले

फिलिप्स S7221 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा HD+ फ्लॅट स्क्रीन डिस्प्ले आहे. गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव जबरदस्त व्हावा यासाठी यात 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच-होल (Punch-hole) डिझाइन वापरण्यात आलं आहे.

64MP AI कॅमेरा आणि 16MP सेल्फी शूटर

ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे, त्यांच्यासाठी या फोनमध्ये एक उत्तम कॅमेरा सेटअप दिला आहे.

बॅक कॅमेरा - फोनच्या मागे 64-मेगापिक्सलचा AI क्षमतेचा मुख्य कॅमेरा आहे. हा कॅमेरा चौकोनी आकारात (Square module) असून, त्यासोबत गोलाकार LED फ्लॅशही दिला आहे.

फ्रंंट कॅमेरा - सेल्फी आणि चांगल्या क्वालिटीच्या व्हिडिओ कॉल्ससाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

5700mAh ची मोठी बॅटरी आणि IP64 रेटिंग

या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॅटरी. दीर्घकाळ बॅकअपसाठी यात तब्बल 5,700mAh क्षमतेची बॅटरी बसवण्यात आली आहे. यासोबतच, धूळ आणि पाण्याच्या थेंबांपासून फोनला वाचवण्यासाठी IP64 रेटिंगची सुरक्षाही दिली आहे. ऑडिओच्या बाबतीत फिलिप्स नेहमीच पुढे असतो. या फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि कंपनीचे खास 'अल्ट्रा मॅक्स ऑडिओ' (Ultra Max Audio) फीचर मिळणार आहे. यामुळे सिनेमा, गाणी आणि गेमिंग करताना उत्तम सराउंड साउंडचा अनुभव मिळेल.

स्टोरेज व्हेरिएंट आणि रंग

हा स्मार्टफोन दोन मुख्य व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल:

6GB रॅम + 128GB स्टोरेज

8GB रॅम + 256GB स्टोरेज

डिझाइनच्या बाबतीत, यात फ्लॅट फ्रेम आणि वक्र (Curved) बॅक पॅनल आहे. हा फोन काळा (Black), चंदेरी (Silver) आणि पांढरा (White) या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.

किंमत आणि लाँच कधी?

फिलिप्स कंपनीने अद्याप या फोनचा प्रोसेसर आणि अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. पण अमेझॉनवर 'Coming Soon' असं दिसतंय, त्यामुळे येत्या काही दिवसांतच भारतात याची किंमत आणि पहिल्या सेलची (Sale Date) तारीख अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे. हा फोन बजेट आणि मिड-रेंज किमतीत बाजारात येऊ शकतो, असा अंदाज आहे.

Philips S7221 ची प्रमुख वैशिष्ट्ये (Quick Specs):

  • डिस्प्ले - 6.67 इंच HD+, 120Hz रिफ्रेश रेट
  • मागील कॅमेरा - 64MP AI ड्युअल कॅमेरा
  • सेल्फी कॅमेरा - 16MP फ्रंट कॅमेरा
  • बॅटरी - 5,700mAh बॅटरी
  • स्पीकर - ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स (अल्ट्रा मॅक्स ऑडिओ)
  • सुरक्षा - IP64 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स
  • रॅम / स्टोरेज - 6GB/8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज
  • नेटवर्क - 5G कनेक्टिव्हिटी
  • उपलब्धता - अमेझॉन इंडिया एक्सक्लुझिव्ह