Kitchen Tips: एअर फ्रायरमध्ये बोंडा, भजी कुरकुरीत करायचीय? मग या टीप्स वापरा
Kitchen Tips: एअर फ्रायरसह स्वयंपाकघरातील अनेक इलेक्ट्रिक उपकरणं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. त्यातही एअर फ्रायरमध्ये कमी तेलात बनवलेले कुरकुरीत पदार्थ अधिक खुसखुशीत होण्यासाठी काय करावं? या खास टिप्स वापरून तर बघा…

प्रत्येकाच्या घरात हवा एक एअर फ्रायर
आजकाल लोकांना आरोग्याची काळजी वाटू लागली आहे. तळलेले पदार्थ खाणं टाळलं जातं, काही जण फास्ट फूडपासून दूर राहतात. त्यामुळेच अनेकांच्या घरात एअर फ्रायर असतो. पण त्यात बोंडा, भजी बनवता येते का? कुरकुरीत होण्यासाठी काय करावं?
मॉडर्न स्वयंपाकघरात या वस्तू हव्यातच
मॉडर्न स्वयंपाकघरात ओव्हन, मिक्सर, इलेक्ट्रिक कुकर, ग्राइंडरसोबत एक एअर फ्रायर हमखास असतोच. या सर्व उपकरणांमुळे स्वयंपाकाचा वेळ तर वाचतोच, शिवाय इंधनाची बचतही होते.
मॉडर्न किचनमध्ये वॉटर केटल असू द्या
आणखी एक उपयुक्त इलेक्ट्रिक किचन आयटम म्हणजे वॉटर केटल. भात लवकर शिजवायचा असेल किंवा गरमागरम पाणी प्यायचं असेल, तर काही क्षणांतच उकळलेलं पाणी मिळतं. प्रत्येक मॉडर्न किचनमध्ये ही वस्तू असायलाच हवी.
वेळ वाचवणाऱ्या घरगुती वस्तूंबद्दल माहिती असू द्या
कोणती वस्तू कशी वापरल्यास वेळ वाचतो आणि स्वयंपाक चविष्ट होतो, याची कल्पना अनेकांना नसते. नोकरी करणाऱ्या महिलांनी ग्राइंडरमध्ये आठवड्याभरासाठी इडली-डोशाचं पीठ तयार करून ठेवल्यास सकाळच्या नाश्त्याची चिंता कमी होते.
रोजच्या स्वयंपाकासाठी मिक्सर हवाच
मिक्सर कसा वापरायचा हे सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात तो अनेक दशकांपासून आहे. ओव्हनचाही गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्याची कला गृहिणीला अवगत असायला हवी. फक्त केक, चॉकलेटच नाही, तर इतर पदार्थ बनवण्यासाठीही तो उपयोगी पडतो.
कुरकुरीत बोंडा, भजी कशी बनवायची?
एअर फ्रायरमध्ये बोंडा, भजी बनवता येते हे सर्वांना माहीत आहे. पण, ती कडक होते. गरमागरम आणि कुरकुरीत कशी बनवायची हे अनेकांना माहीत नसतं. ते कसं करायचं, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कांदा, पुदिना पकोडा रेसिपी
समजा तुम्हाला कांदा-पुदिना पकोडा बनवायचा आहे. 100 ते 120 ग्रॅम बेसन, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, दोन मध्यम आकाराचे कांदे, एक मूठभर पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, मीठ, तिखट, हळद, ओवा, चिमूटभर बेकिंग सोडा, 10 मिली कडकडीत गरम तेल घालून, पाणी न टाकता कांद्याच्या रसातच घट्ट पीठ मळून घ्या.
एअर फ्रायरमध्ये 375°F वर 15 मिनिटं शिजवा
एअर फ्रायरमध्ये 375°F तापमानावर सुमारे 15 मिनिटं एका बाजूने शिजवा. नंतर उलटून आणखी पाच मिनिटं शिजवा.
पकोड्यांवर ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब लावा
पण शिजवताना पकोड्यांवर ऑलिव्ह ऑईलचे एक-दोन थेंब लावा. यामुळे पकोड्यांचा पृष्ठभाग कोरडा होणार नाही. तेलात तळलेल्या पकोड्यांसारखीच चव येईल. साधारण 12-13 पकोड्यांसाठी 13-15 मिली तेल पुरेसं आहे.
एअर फ्रायर वापरल्यास भांडी घासण्याची चिंता नाही
हेल्दी तर आहेच. तेलात तळल्यावर उरलेलं तेल पुन्हा वापरणं, खर्च करणं, तेलकट कढई घासणं यासारखी डोकेदुखीची कामं एअर फ्रायर वापरल्यामुळे टळतात.
अशाप्रकारे नक्की ट्राय करून पाहा
अशाच प्रकारे मसाला वडा, आंबोडे यांसारखे तेलात तळले जाणारे सर्व पदार्थ ट्राय करून पाहा. मग एअर फ्रायर किती चांगला आहे हे तुमच्या लक्षात येईल. आजच ट्राय करणार ना?

