Kitchen Hacks: तुमच्या कुकरमधूनही डाळ अशीच उतू जाते का? सोप्या टिप्सने आळा घाला
Kitchen Hacks: प्रेशर कुकरने आपलं काम खूप सोपं केलं आहे. डाळी, नॉनव्हेज लवकर शिजवण्यासाठी याचा उपयोग होतो. पण कुकरमधून डाळ किंवा पाणी उतू जाण्याची समस्या अनेकांना येते.

कुकरमध्ये डाळ शिजवताना ती बाहेर का येते?
प्रेशर कुकरमध्ये डाळ, बीन्स, तांदूळ शिजवताना अनेकांना एकच समस्या येते. शिट्टी होताना पांढरा फेस बाहेर येतो. याचं मुख्य कारण म्हणजे त्या अन्नपदार्थांमध्ये असलेलं स्टार्च. शिजताना स्टार्च पाण्यात मिसळून फेस तयार होतो. हा फेस वाफेच्या दाबाने बाहेर येतो.
फेस बाहेर आल्यामुळे काय त्रास होतो?
कुकरमधून फेस बाहेर आल्यास संपूर्ण स्वयंपाकघर अस्वच्छ होतं. गॅस शेगडीवर डाळ सांडते. काहीवेळा कुकरच्या शिट्टीभोवती फेस चिकटून राहतो आणि ते साफ करणंही कठीण होतं. यामुळे स्वयंपाक करणं एक डोकेदुखी होऊन बसतं.
कुकरमधून फेस बाहेर येण्यापासून कसं रोखायचं?
ही समस्या फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. काही सोपे घरगुती उपाय केल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. विशेषतः डाळ, बीन्स, तांदूळ कुकरमध्ये लावताना आधीच काही काळजी घेतली पाहिजे.
तेल किंवा तूप वापरण्याची सोपी युक्ती
कुकरमध्ये डाळ टाकल्यानंतर एक चमचा तेल किंवा तूप घाला. असं केल्याने फेस तयार होण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे फेस बाहेर येणं कमी होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुकर कधीही जास्त भरू नये. डाळ शिजवताना कुकर अर्धाच भरणं चांगलं असतं.
स्टीलचा चमचा वापरण्याची सोपी ट्रिक
ज्यांना तेल किंवा तूप घालायचं नसेल, त्यांच्यासाठी आणखी एक सोपा मार्ग आहे. कुकरचं झाकण लावण्यापूर्वी आत एक स्वच्छ स्टीलचा चमचा ठेवा. शिजताना तयार होणारे बुडबुडे हा चमचा फोडतो. त्यामुळे फेस नियंत्रणात राहतो. या सोप्या टिप्स वापरल्यास जवळपास ९० टक्के कुकरमधून फेस बाहेर येण्याची समस्या कमी होते आणि स्वयंपाकघर स्वच्छ राहतं.

