Kia Sorento 7 Seater SUV : किआची नवीन तीन-रो SUV, सोरेंटो, भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. हे मॉडेल ब्रँडचे पहिले हायब्रीड मॉडेल म्हणून पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Kia Sorento 7 Seater SUV : किआची नवीन तीन-रो SUV, किआ सोरेंटो, भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भारतात या कारची चाचणी पहिल्यांदाच होत आहे. दक्षिण कोरियन वाहन निर्मात्या कंपनीच्या पहिल्या हायब्रीड मॉडेल्सपैकी हे एक असेल. पुढील वर्षी हे मॉडेल लॉन्च होण्याची शक्यता आहे. लॉन्च झाल्यावर किआ सोरेंटो सेल्टोसच्या वरच्या स्थानी असेल. 2026 च्या सुरुवातीला यात जनरेशन बदल केला जाईल.
कोणत्या अपेक्षा आहेत?
सोरेंटोच्या इंटीरियरचे तपशील आणि फीचर्स कंपनीने अधिकृतपणे उघड केलेले नाहीत. तरीही, ग्लोबल-स्पेक मॉडेलमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्ससहच इंडिया-स्पेक व्हर्जन येण्याची शक्यता आहे. पॅनोरॅमिक कर्व्हड् स्क्रीन सेटअप, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, वायरलेस चार्जिंग पॅड, 12-स्पीकर बोस साउंड सिस्टीम, HUD, हिल स्टार्ट असिस्ट, ESC, 360-डिग्री कॅमेरा आणि एकाधिक एअरबॅग्ज यांसारखी प्रमुख वैशिष्ट्ये अपेक्षित आहेत. केबिनमधील रोटरी डायल गिअर सिलेक्टरवरून हे हायब्रीड व्हेरिएंट असल्याचे स्पष्ट होते.
या इंधन प्रकारांमध्ये येणार
जागतिक बाजारपेठांमध्ये, नवीन सोरेंटो 1.6-लिटर टर्बो पेट्रोल-हायब्रीड, 1.6-लिटर प्लग-इन हायब्रीड, 2.5-लिटर पेट्रोल आणि 2.5-लिटर टर्बो पेट्रोलसह अनेक इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. आगामी नवीन जनरेशन किआ सेल्टोस आणि 2026 किआ सोरेंटोसाठी किआ इंडिया 1.5-लिटर पेट्रोल इंजिनला हायब्रीड करण्याची शक्यता आहे. हायब्रीड सेल्टोस 2027 मध्ये येण्याची अपेक्षा आहे, तर सोरेंटो हे भारतातील ब्रँडचे पहिले हायब्रीड मॉडेल बनण्याची शक्यता आहे.
किंमत किती असेल?
टेस्टिंग दरम्यान दिसलेली गाडी पूर्णपणे कॅमफ्लाजने झाकलेली होती. तरीही, तिची सिग्नेचर बॉक्सी आणि सरळ रचना स्पष्टपणे दिसत होती. या SUV मध्ये किआची टायगर नोज ग्रिल, T-आकाराचे LED DRLs, उंच बोनेट, चौकोनी व्हील आर्च, 235/55 R19 टायर्ससह 19-इंच अलॉय व्हील्स, एक सपाट टेलगेट आणि कनेक्टेड टेललॅम्प्स यांचा समावेश आहे. ग्लोबल-स्पेक सोरेंटोची लांबी 4.8 मीटर आणि व्हीलबेस 2,800 मिमी आहे. भारतात लॉन्च झाल्यावर किआ सोरेंटोची किंमत अंदाजे 35 लाख रुपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही गाडी स्कोडा कोडियाक, टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लॉस्टर सारख्या SUV शी स्पर्धा करेल.
हेही वाचा : मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, किया, टेस्ला, स्कोडा, टोयोटा आदी कार कंपन्यांच्या कारची अपडेटेड माहिती जाणून घ्या. ऑटोमोबाईलच्या इतरही बातम्या वाचण्यासाठी आमच्या विशेष पेजला नक्की भेट द्या. येथे क्लिक करा..


