कावासाकीने आपली जबरदस्त स्टायलिश क्रूझर बाईक Vulcan S भारतात लाँच केली आहे. रस्त्यावरून जाताना प्रत्येकाची नजर खिळवून ठेवणारी ही बाईक आहे. जाणून घेऊया या बाईकची किंमत आणि दमदार परफॉर्मन्सबद्दल.

मुंबई : भारतात स्वस्त बाईक्सपासून ते महागड्या प्रीमियम बाईक्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या रेट्रो स्टाईल आणि दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक्सना मोठी मागणी आहे. याच दरम्यान, कावासाकीने आपली अपडेटेड व्हर्जन असलेली कावासाकी वल्कन एस (Kawasaki Vulcan S) 2027 बाईक भारतात लाँच केली आहे. ही बाईक इतकी स्टायलिश आहे की रस्त्यावरून जाताना सगळेजण एकदा तरी वळून पाहतील.

वल्कन एस बाईकची किंमत

कावासाकीने लाँच केलेल्या या वल्कन एस बाईकची किंमत तब्बल 8.23 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हो, ही एक महागडी बाईक आहे, कारण तिचे इंजिन आणि परफॉर्मन्स एखाद्या कारसारखा आहे. उदाहरणार्थ, मारुती 800 कारमध्ये 796 सीसी इंजिन असते, तर या कावासाकी वल्कन एस बाईकमध्ये 649 सीसी पॅरलल-ट्विन इंजिन आहे. त्यामुळे भारतातील महागड्या बाईक्सच्या यादीत आता कावासाकी वल्कन एसचाही समावेश झाला आहे.

वल्कन एस बाईकचा परफॉर्मन्स

कावासाकी वल्कन एस बाईकमध्ये 649cc चे दमदार इंजिन आहे. हे इंजिन 61hp ची पॉवर आणि 62.4Nm चा टॉर्क जनरेट करते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही पॉवर अनेक छोट्या कारपेक्षाही जास्त आहे. मारुती 800 कार 39.5 bhp पॉवर आणि 59 Nm टॉर्क देते. या तुलनेत कावासाकी वल्कन एस बाईक खूपच पॉवरफुल आहे.

क्रूझर स्टाईल बाईक

कावासाकी वल्कन एस ही एक क्रूझर स्टाईल बाईक आहे, ज्यामुळे तिचा लूक खूपच आकर्षक दिसतो. शहरातल्या प्रवासासाठी असो किंवा लाँग राईडसाठी, ही बाईक कोणत्याही रस्त्यावर चालवण्यासाठी उत्तम आहे. ही बाईक मेटॅलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक, मेटॅलिक कार्बन ग्रे आणि सटल ब्लुइश ग्रीन अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. काही किरकोळ बदल वगळता, 2027 चे अपडेटेड मॉडेल आणि सध्या बाजारात असलेले मॉडेल दिसायला जवळपास सारखेच आहेत.

ही बाईक रॉयल एनफिल्ड मिटिओर 650 ला थेट टक्कर देते. आता भारतीय बाजारात कावासाकी वल्कन एस बाईकची मागणी वाढण्याची शक्यता आहे.