Jobs Alert: सोशल मीडिया आता केवळ मनोरंजनासाठी टाइमपास करण्याचे व्यासपीठ राहिलेले नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर यांसारखे प्लॅटफॉर्म लाखो-कोटी रुपये कमावून देणारे डिजिटल ऑफिस बनले आहेत. यात कोणकोणते जॉब्ज आहेत, जाणून घेऊयात.

Jobs Alert: सोशल मीडिया जॉब्स हे आजच्या डिजिटल युगात करिअरचे उत्तम साधन बनले आहे, ज्यामध्ये सोशल मीडिया मॅनेजर, कन्टेन्ट क्रिएटर आणि डिजिटल मार्केटर यांसारख्या पदांवर चांगली कमाई होऊ शकते. हे क्षेत्र ब्रँड प्रमोशन, प्रेक्षक वाढवणे आणि ऑनलाइन मार्केटिंगसाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही देखील तासन् तास कॉम्प्युटरवर बसून काम करू शकत असाल तरी मराठी भाषेत अनेक सर्जनशील कामाचा आनंद घेऊ शकता. आऊट ऑफ बॉक्स विचार करुन या क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

सोशल मीडिया आता केवळ मनोरंजनासाठी टाइमपास करण्याचे व्यासपीठ राहिलेले नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर यांसारखे प्लॅटफॉर्म लाखो-कोटी रुपये कमावून देणारे डिजिटल ऑफिस बनले आहेत. सोशल मीडिया इकॉनॉमिक्सनुसार, क्रिकेटपटू विराट कोहली 12 कोटी, तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा 3 कोटी आणि दीपिका पदुकोण 1.5 कोटी रुपये फक्त इन्स्टाग्रामवरून कमावतात.

बिग बॉसच्या विजेत्या अभिनेत्याच्या इन्स्टाग्राम पेजवर 2 मिलियन फॉलोअर्स झाल्याची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा त्याचे पेज एक पीआर टीम सांभाळत असल्याचीही झाली. केवळ एक अभिनेताच नाही, तर बहुतेक सेलिब्रिटी आणि प्रभावशील व्यक्तींची सोशल मीडिया खाती कंपन्या किंवा पीआर टीमच्या हातात आहेत. त्यांनी या पेजेसना उत्पन्नाचे साधन बनवले आहे. प्रत्येक पोस्टसाठी ठराविक रक्कम निश्चित केलेली असते. सोशल मीडियावरील ही नोकरी केवळ बंगळूरसारख्या महानगरांपुरती मर्यादित नाही. खेडी, गावे, शहरे असा कोणताही भेद न करता हे क्षेत्र पूर्णवेळ रोजगार देत आहे.

मागणी असलेले विषय

सोशल मीडिया नोकरी आणि उत्पन्नाचे साधन बनत असताना, मराठी कंटेंट क्रिएटर्स मराठीतच अनेक विषय तयार करत आहेत. खाद्यपदार्थ, कृषी, शिक्षण, विनोद, प्रवास, स्थानिक इतिहास, सिनेमा यांसारख्या विषयांना जास्त मागणी आहे. इंग्रजी किंवा हिंदी कंटेंटच्या तुलनेत मराठी कंटेंटला प्रामाणिक आणि निष्ठावान प्रेक्षकवर्ग आहे. तसेच, इथे स्पर्धाही कमी आहे, हा मराठी कंटेंट क्रिएटर्ससाठी मोठा फायदा आहे.

उत्पन्नाचे स्रोत

- यूट्यूब जाहिराती, ब्रँड सहयोग, मेंबरशिप आणि स्पॉन्सर्ड व्हिडिओंच्या माध्यमातून उत्पन्न देते. 50 हजार ते 1 लाखांपर्यंत कायम सबस्क्रायबर्स असल्यास आणि सातत्याने कंटेंट दिल्यास चांगले मासिक उत्पन्न मिळू शकते.

- फेसबुकवर रील्स, इन-स्ट्रीम जाहिराती आणि पेज बोनसच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी वाढत आहेत. विशेषतः 30 वर्षांवरील आणि स्थानिक कथा सांगणाऱ्या क्रिएटर्ससाठी येथे चांगल्या संधी आहेत.

- इन्स्टाग्रामवर थेट आर्थिक उत्पन्न कमी असले तरी, ब्रँड डील्स, एफिलिएट लिंक्स आणि वैयक्तिक ब्रँडिंगद्वारे चांगले उत्पन्न मिळते.

- भाषण कार्यक्रम, पुस्तक विक्री, प्रशिक्षण कार्यशाळा, सल्ला सेवा, स्थानिक व्यवसायांची जाहिरात इत्यादींमधून अप्रत्यक्ष उत्पन्नाच्या संधी आहेत.

प्रतिभेपेक्षा शिस्त महत्त्वाची

पण, रातोरात सोशल मीडियावर अकाऊंट उघडून बँक बॅलन्स तपासू नका. इथे उत्पन्न आहे हे खरं आहे, पण ते लगेच मिळत नाही. एक ते तीन वर्षे सतत मेहनत घेतल्यास सबस्क्रायबर्स वाढतात आणि व्ह्यूज जास्त येतात. हेच उत्पन्नाचे साधन बनते. या बाबतीत प्रतिभेपेक्षा शिस्त जास्त महत्त्वाची आहे.

लक्षात ठेवण्यासारखी 10 सूत्रे

सोशल मीडियावरील उत्पन्न स्थिर नसते. त्यामुळे उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत तयार करण्यासाठी आणि सतत पैसे मिळत राहावेत यासाठी तज्ज्ञांनी काही सल्ले आणि सूत्रे सांगितली आहेत. ही सूत्रे मराठी कंटेंट क्रिएटर्सनी पाळायला हवीत.

1. सोशल मीडिया एक पूर्णवेळ व्यवसाय म्हणून यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर रचनात्मक कमाईची संधी देत आहे.

2. स्थानिक भाषेतील निष्ठावान प्रेक्षकांना लक्षात घेऊन तयार केलेल्या मराठी कंटेंटला चांगली मागणी आहे. यामुळे स्पर्धेशिवाय स्थानिक प्रेक्षकांना आकर्षित करता येते.

3. जाहिरात, स्पॉन्सरशिप, मेंबरशिप आणि ब्रँडेड कंटेंटच्या माध्यमातून यूट्यूब सर्वात स्थिर उत्पन्न देते.

4. रील्स, इन-स्ट्रीम जाहिरातींमुळे फेसबुक प्रादेशिक क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरत आहे.

5. इन्स्टाग्रामवर ब्रँडिंग उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे ब्रँड सहयोग आणि एफिलिएट मार्केटिंग.

6. कंटेंट व्हायरल होण्यासाठी सतत प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. नियमित पोस्टमुळे उत्पन्न वाढते.

7. स्थिर उत्पन्नासाठी साधारणपणे 1 ते 3 वर्षे थांबावे लागते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात उत्पन्न हळू वाढते.

8. उत्पन्नाचे अनेक स्रोत असणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ जाहिरातींवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते.

9. शिक्षक, पत्रकार, शेतकरी, तज्ज्ञ यांनी तयार केलेला कंटेंट वैयक्तिक विश्वासावर आधारित असतो आणि हाच विश्वास उत्पन्न वाढवतो.

10. सोशल मीडिया फायदेशीर असला तरी अस्थिर आहे. त्यामुळे दीर्घकालीन यशासाठी आर्थिक नियोजन आणि बचत आवश्यक आहे.