Social Media: इंस्टाग्राम रील्समुळे पती-पत्नी विभक्त होत आहेत का? काय आहे वास्तव
Social Media : आजकाल प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन दिसतो. सोशल मीडियावर वापरणारेही जवळपास तेवढेच आहेत. विशेषतः इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या ॲपमुळे घटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे, यावर विश्वास बसेल का? सर्व्हेमधून हेच समोर येत आहे -
13

Image Credit : AI Generated
घटस्फोट
अनेक लोक फक्त रील्स पाहण्यासाठी इंस्टाग्राम वापरतात. एकदा रील्स पाहण्यास सुरुवात केली की, ते स्वत:ला थांबवू शकत नाहीत आणि त्याचे व्यसन लागलेले अनेकजण आहेत. पण, अनेक सर्वेक्षणं, कायदेशीर तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांच्या मते, हे रील्स पती-पत्नींच्या घटस्फोटाला कारणीभूत ठरत आहेत. यामागे काय कारणं आहेत ते आता पाहूया...
23
Image Credit : Getty
आभासी जगाशी तुलना (The Comparison Trap)
रील्समधील इतरांच्या सुंदर आयुष्याशी तुलना केल्याने असंतोष वाढतो. तासन् तास रील्स पाहिल्याने, एकमेकांना पुरेसा वेळ न दिल्यामुळे नात्यात दुरावा येतो. अशातच खासगी गोष्टी शेअर केल्याने भांडणे होतात.
33
Image Credit : Gemini
संशय आणि अनैतिक संबंध
रील्समुळे होणाऱ्या ओळखींमधून विवाहबाह्य संबंध आणि संशय वाढतो. रील्ससाठी केलेल्या खर्चामुळे आर्थिक समस्या येतात. यावर उपाय आहे, तो म्हणजे एकमेकांशी बोला, तुलना टाळा आणि मर्यादित वापर करा.

